Today Petrol-Diesel Price : तेल विपणन कंपन्यांनी अपडेट केल्या किंमती, आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय

Today's Petrol-Diesel Price : तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत कच्चा तेलाच्या किंमती भडकूही शकतात. पण भारताच्या रणनीतीमुळे अमेरिकेच्या धोरणाचा भारतावर परिणाम होणार नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. भारत रशियासह इतर देशांकडून कच्चा तेलाची खरेदी करत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.

Today Petrol-Diesel Price : तेल विपणन कंपन्यांनी अपडेट केल्या किंमती, आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 8:39 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाने (Crude Oil Price) आज डॉलर समोर नांगी टाकली. त्यामुळे कच्चा तेलाचे भाव कमजोर पडले. डॉलर मजबूत करण्यासाठी अमेरिकन केंद्रीय बँकेने कडक पावले टाकली आहेत. अमेरिकन रिझर्व्ह फेडरलने (Federal Reserve) व्याजदरात वाढीचे धोरण अंगिकारले आहे. त्याचा परिणाम कच्चा तेलासह सोन्यावरही दिसून येत आहे. पण तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत कच्चा तेलाच्या किंमती भडकूही शकतात. पण भारताच्या रणनीतीमुळे अमेरिकेच्या धोरणाचा भारतावर परिणाम होणार नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. भारत रशियासह इतर देशांकडून कच्चा तेलाची खरेदी करत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.

तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, येत्या काही आठवड्यात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होऊ शकते. अमेरिकन फेडरल बँक व्याजदरात वाढ करु शकते. तसेच अमेरिकेत इंधनाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. तर चीन पण तेल आयातीवर भर देत आहे. भारतही या स्पर्धेत आहे. वाढत्या मागणीमुळे कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर (Petrol Diesel Price) परिणाम होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा संकेत दिले की, पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येऊ शकते. सोमवारी राजस्थानमधील जयपूरमध्ये एका कार्यक्रमात सीतारमण बोलत होत्या. अर्थात त्यांनी हा निर्णय केवळ जीएसटी परिषद आणि राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी मनावर घेतला तरच होऊ शकतो, अशी अट कायम ठेवली आहे. सर्व राज्यांच्या सहमतीशिवाय त्यावर तोडगा निघणार नाही.

हे सुद्धा वाचा

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही

मुंबई

पेट्रोल 106.31 प्रति लिटर

डिझेल 94.27 प्रति लिटर

अहमदनगर

पेट्रोल 106.24 प्रति लिटर

डिझेल 92.77 प्रति लिटर

अकोला

पेट्रोल 106.31 प्रति लिटर

डिझेल 92.85 प्रति लिटर

अमरावती

पेट्रोल 107.44 प्रति लिटर

डिझेल 93.94 प्रति लिटर

औरंगाबाद

पेट्रोल 106.26 प्रति लिटर

डिझेल 92.77 प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.21 प्रति लिटर

डिझेल 92.75 प्रति लिटर

नांदेड

पेट्रोल 108.87 प्रति लिटर

डिझेल 95.30 प्रति लिटर

जळगाव

पेट्रोल 107.18 प्रति लिटर

डिझेल 93.67 प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.24 प्रति लिटर

डिझेल 92.76 प्रति लिटर

लातूर

पेट्रोल 107.72 प्रति लिटर

डिझेल 94.20 प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.63 प्रति लिटर

डिझेल 93.16 प्रति लिटर

पुणे

पेट्रोल 105.54 प्रति लिटर

डिझेल 93.04 प्रति लिटर

सोलापूर

पेट्रोल 106.91 प्रति लिटर

डिझेल 93.42 प्रति लिटर

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.