AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol-Diesel Price : तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोलचा-डिझेलचा भाव काय? किंमती लवकरच येणार जमिनीवर

Today Petrol-Diesel Price : इंधन दरवाढीवरुन जनतेत मोठा रोष आहे. केंद्र सरकारने याविषयी लवकरच तोडगा काढण्याची शक्यता आहे. इंधनावरील कराचा भार कमी करण्याची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्तवली आहे.

Today Petrol-Diesel Price : तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोलचा-डिझेलचा भाव काय? किंमती लवकरच येणार जमिनीवर
आजचा भाव काय
| Updated on: Feb 21, 2023 | 8:33 AM
Share

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा-सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol Diesel Price) कुठलाही बदल झालेला नाही. देशात दोन वर्षांपूर्वी पेट्रोल-डिझेलचे भाव झपाट्याने वाढले. हे भाव 120 रुपयांच्या आसपास गेल्यावर मोठी आरोड झाली. त्यानंतर केंद्र सरकारने त्यावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. तर काही राज्यांनीही कर कपात केली. त्याचा थोडा दिलासा जनतेला मिळाला. मे 2022 नंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झालेली नाही. मात्र दिलासा ही मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) घसरणीवर आहेत. धन दरवाढीवरुन जनतेत मोठा रोष आहे. केंद्र सरकारने याविषयी लवकरच तोडगा काढण्याची शक्यता आहे. इंधनावरील कराचा भार कमी करण्याची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी वर्तवली आहे.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

  1. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही
  2. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  3. अहमदनगर पेट्रोल 106.96 तर डिझेल 93.46 रुपये प्रति लिटर
  4. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  5. अमरावतीत 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  6. औरंगाबाद 107.98 पेट्रोल आणि डिझेल 95.94 रुपये प्रति लिटर
  7. नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 तर डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
  8. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  9. जळगावमध्ये पेट्रोल 107.22 आणि डिझेल 93.73 रुपये प्रति लिटर
  10. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  11. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  12. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.55 आणि डिझेल 93.08 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर आहे

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?