AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol Diesel Price : रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची किंमत, आज काय आहे भाव

Today Petrol Diesel Price : रविवारी बाहेर फिरायला निघण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरलेल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून कच्चा तेलाचे दर आटोक्यात आहेत. तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा भाव काय आहे.

Today Petrol Diesel Price : रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची किंमत, आज काय आहे भाव
पेट्रोल डिझेलचे दर काय
| Updated on: Feb 19, 2023 | 8:47 AM
Share

नवी दिल्ली : रविवारी बाहेर फिरायला निघण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती (Crude Oil Price) घसरलेल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून कच्चा तेलाचे दर आटोक्यात आहेत. आज डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलच्या किंमती 76.34 डॉलर प्रति बॅरलवर आहेत. तर ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 83 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या आहेत. तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) अपडेट करतात. सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमतीत 81 पैशांची वाढ होऊन ते 106.96 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेलमध्ये 79 पैशांची वाढ झाली असून त्याचा भाव 93.46 रुपये प्रति लिटरवर पोहचला आहे. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

मोदी सरकारने (Modi Government) गेल्या सहा महिन्यात, 22 मे 2022 पासून देशात इंधन दरवाढ होऊ दिली नाही. पण जनतेला मोठा दिलासाही दिला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण (Nirmala Sitharaman) यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त झाल्यातर जनतेला हा मोठा दिलासा असेल. या निर्णयामुळे महागाई आटोक्यात आणण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल.

  1. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही
  2. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहेअहमदनगर पेट्रोल 106.96 तर डिझेल 93.46 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.40 पेट्रोल आणि डिझेल 94.87 रुपये प्रति लिटर
  6. नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 तर डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
  7. नांदेडमध्ये पेट्रोल 108.37 तर डिझेल 94.83 रुपये प्रति लिटर
  8. जळगावमध्ये पेट्रोल 107.22 आणि डिझेल 93.73 रुपये प्रति लिटर
  9. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  10. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  11. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.58 रुपये तर डिझेल 93.10 रुपये प्रति लिटर आहे

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?