AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol Diesel price : केंद्र सरकारचे निवडणुकीच्या तोंडावर मधाचे बोट, पेट्रोल-डिझेल खरंच होणार स्वस्त?

Today Petrol Diesel price : लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरु झाल्याचे संकेत मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर कपातीचे संकेत दिले आहेत.

Today Petrol Diesel price : केंद्र सरकारचे निवडणुकीच्या तोंडावर मधाचे बोट, पेट्रोल-डिझेल खरंच होणार स्वस्त?
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
| Updated on: Feb 17, 2023 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. दोन वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) गगनाला भिडले आहेत. मोदी सरकारने (Modi Government) गेल्या सहा महिन्यात, 22 मे 2022 पासून देशात इंधन दरवाढ होऊ दिली नाही. पण जनतेला मोठा दिलासाही दिला नाही. लोकसभेच्या निवडणुका एका वर्षांनी होणार आहेत. त्याची रंगीत तालीम मात्र सुरु झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण (Nirmala Sitharaman) यांनी राज्यांनी सहमती दर्शवली तर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या (GST) कक्षेत आणण्याची री यापूर्वी ओढली होती. आता त्यांचा सूर नरमला आहे. त्यांनी पेट्रोल-डिझेलवरील करांचा अधिभार कमी होण्याचे संकेत दिले आहेत. अर्थात अजून याविषयीची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त झाल्यातर जनतेला हा मोठा दिलासा असेल. या निर्णयामुळे महागाई आटोक्यात आणण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल.

गेल्या एक वर्षांपासून महागाई आटोक्यात आणण्यासाठी रेपो दर वृद्धीवर भर देणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) केंद्र सरकारला इंधन दर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. पेट्रोलियम उत्पादनावरील कर कपात असा सल्ला केंद्रीय बँकेने दिला आहे. इंधन दर कमी झाल्यास वाहतूक खर्च कमी होऊन महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळू शकतो.

तर देशातील काही राज्य सरकारांनी करात कपात केल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. हिमाचल प्रदेशात मात्र डिझेलवर कराचा अधिभार वाढला आहे. ब्रेंट क्रूडच्या भावात आज घसरण झाली. हा भाव आज 84.61 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. तर डब्ल्यूटीआयचा भाव 78.01 डॉलर प्रति बॅरल झाला आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

  1. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही
  2. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  3. अहमदनगर पेट्रोल 107.17 तर डिझेल 93.66 रुपये प्रति लिटर
  4. अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  5. अमरावतीत 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रति लिटर
  6. औरंगाबाद 106.42 पेट्रोल आणि डिझेल 92.93 रुपये प्रति लिटर
  7. नागपूरमध्ये पेट्रोल 106.27 तर डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर
  8. नांदेडमध्ये पेट्रोल 107.69 तर डिझेल 94.18 रुपये प्रति लिटर
  9. जळगावमध्ये पेट्रोल 106.89 आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
  10. नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  11. लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  12. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.25 आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.99 रुपये तर डिझेल 93.49 रुपये प्रति लिटर आहे

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.