AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol Diesel price : पेट्रोल-डिझेल GST च्या परीघात? महागाईवर रामबाण उपाय शोधणार केंद्र सरकार

Today Petrol Diesel price : पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आता बळावली आहे. गेल्या दोन वर्षांत इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. काही वर्षांपूर्वी काँग्रेसने इंधन दरवाढ केल्यावर रस्त्यावर उतरलेली विरोधकच आता सत्तेत आहेत. त्यांच्या काळात पेट्रोल-डिझेल शंभरीच्या आतबाहेर आहे.

Today Petrol Diesel price : पेट्रोल-डिझेल GST च्या परीघात? महागाईवर रामबाण उपाय शोधणार केंद्र सरकार
इंधनाची स्वस्ताई?
| Updated on: Feb 16, 2023 | 8:26 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्यावर्षी तीन ते चार महिने वगळता कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) सातत्याने घसरणीवर आहेत. कच्चा तेलाने अनेकदा नीच्चांकी सूर मारला आहे. पण देशात अद्यापही पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) सर्वसामान्यांच्या नाकावर टिच्चून तोरा गाजवत आहेत. देशात इंधनाचे दर कमी होण्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. केंद्र सरकारने याविषयीचे अधिकृत वक्तव्य केलेले नाही. प्रत्येक वेळी तेल विपणन कंपन्यांना मोठा तोटा होत असल्याचे तुणतुणे वाजविले जाते. पण पेट्रोल-डिझेलवरील करांचा बोजा कमी करण्यावर ना केंद्र सरकार (Central Government) तयार आहे ना राज्य सरकार. गेल्या एक वर्षांपासून महागाई आटोक्यात आणण्यासाठी रेपो दर वृद्धीवर भर देणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) केंद्र सरकारला इंधन दर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. पेट्रोलियम उत्पादनावरील कर कपातीचा (Reduce Tax on Petroleum Products) सल्ला देण्यात आला आहे. इंधन दर कमी झाल्यास वाहतूक खर्च कमी होऊन महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळेल, हे सांगायला ज्योतिषाची नक्कीच गरज नाही.

देशात 22 मे 2022 पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा फरक पडलेला नाही. हरियाणातील नवीन सरकारने डिझेलवर तीन रुपयांचा अधिभार लावल्याने तिथे डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. तर देशातील काही राज्य सरकारांनी करात कपात केल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव आज 85.38 डॉलर प्रति बॅरलवर स्थिर आहे. तर डब्ल्यूटीआयचा भाव 78.50 डॉलर प्रति बॅरल आहे.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सध्या भारत जागतिक तेल उत्पादक देशांकडून कच्चे तेल खरेदीवर भर देत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. कोलंबिया, रशिया, लिबिया यासह छोट्या राष्ट्रांकडूनही भारताने इंधन आयात सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळण्याची दाट शक्यता आहे.

  1. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही
  2. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  3. अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
  4. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  5. अमरावतीत 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
  6. औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  7. नागपूरमध्ये पेट्रोल 106.28 तर डिझेल 92.82 रुपये प्रति लिटर
  8. नांदेडमध्ये पेट्रोल 108.50 तर डिझेल 94.96 रुपये प्रति लिटर
  9. जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
  10. नाशिकमध्ये पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर
  11. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  12. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर आहे

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच