कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; जाणून घ्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर काय होणार परिणाम?

| Updated on: Nov 22, 2021 | 10:47 AM

जागतिक बाजारामध्ये पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाचे दर घसरले. आज कच्च्या तेलाचे भाव कमी होऊन 78.51 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.

कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; जाणून घ्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर काय होणार परिणाम?
पेट्रोल-डिझेल
Follow us on

नवी दिल्ली : जागतिक बाजारामध्ये पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाचे दर घसरले. आज कच्च्या तेलाचे भाव कमी होऊन 78.51 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. दरम्यान यापूर्वी शनिवारी देखील दरामध्ये तीन टक्क्यांची घसरण पहायाला मिळाली होती. आज पुन्हा एकदा दर  0.48 टक्क्यांनी कमी झाले आहेत.  कोरोनाचे सावट कमी झाल्याने जगतीक स्थरावर कच्च्या तेलाचे उत्पादन वाढले आहे. याचा परिणाम म्हणेज तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर घटल्याने येणाऱ्या काळात भारतामध्ये पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

साधारणपणे कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर अवलंबून असात. कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात आणि दर कमी झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. मात्र आज कच्चा तेलाच्या किमतीमध्ये तीन टक्क्यांची घट होऊन देखील भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

 

संंबंधित बातम्या 

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी ‘एनपीएस’ ठरते वरदान; जाणून घ्या काय आहे योजना, कशी कराल गुंतवणूक?

ई-श्रम पोर्टलवर 8.43 कोटी कामगारांनी केली नोंदणी; जाणून घ्या काय आहेत फायदे?

Amazon BFCM Sale: Amazon चा BFCM सेल 25 नोव्हेंबरपासून सुरू, 70 हजार निर्यातदारांचा सहभाग