AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकार ‘या’ कंपनीतील हिस्सेदारी विकणार; शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढणार?

NMDC Disinvestment | आतापर्यंत NMDC च्या समभागांसाठी फक्त संस्थात्मक गुंतवणुकदारांना बोली लावता येत होती. मात्र, बुधवारपासून सामान्य गुंतवणुकदारांसाठीही ही समभागविक्री खुली होणार आहे.

मोदी सरकार 'या' कंपनीतील हिस्सेदारी विकणार; शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढणार?
निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 7:47 AM
Share

मुंबई: मोदी सरकार खनिज क्षेत्रातील NMDC या कंपनीतील आपली भागीदारी लवकरच विकणार आहे. त्यामुळे भांडवली बाजारात या कंपनीच्या समभागाचा भाव वधारण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात मंगळवारी NMDC च्या 7 टक्के समभागविक्रीच्या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. (Disinvestment of NMDC retail investors can bid today)

आतापर्यंत NMDC च्या समभागांसाठी फक्त संस्थात्मक गुंतवणुकदारांना बोली लावता येत होती. मात्र, बुधवारपासून सामान्य गुंतवणुकदारांसाठीही ही समभागविक्री खुली होणार आहे. या समभागांचे किमान मूल्य 165 रुपये इतके निश्चित करण्यात आले असून केंद्र सरकार 7.49 टक्के हिस्सेदारी म्हणजे 21.95 कोटी समभागांची विक्री करणार आहे. या माध्यमातून केंद्र सरकारला तब्बल 3700 कोटी रुपये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. बुधवारी NMDC च्या समभागाची किंमत 3.22 टक्क्यांनी घसरुन 169.65 रुपये इतकी झाली.

मोदी सरकार LIC बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सरकारी बँकांपाठोपाठ आता मोदी सरकारने जीवन बीमा निगम अर्थात LIC मधील हिस्सेदारी विकण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या आठवड्यात एलआयसीच्या प्रारंभिक खुली भागविक्रीला (IPO) केंद्रीय मंत्रिमडळाकडून मंजुरी मिळू शकते. जानेवारी 2022 पर्यंत एलआयसीतील काही हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. त्यामुळे सध्या आयपीओसंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकार लवकरच व्यापारी बँकांकडून निवीदा मागवू शकते. तर दुसरीकडे अर्थमंत्रालयाने मिलीमैन एडवाइजर्स एलएलपी इंडिया या कंपनीला LIC चे मूल्य ठरवण्याचे काम दिले होते. LIC चा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.

IDBI बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात

आयडीबीआय बँकेतील निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने कायदेशीर आणि व्यावहारिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने आता केंद्राने आयडीबीआय निर्गुंतवणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार केंद्र सरकार आणि एलआयीकडून आयडीबीआय (IDBI Bank) बँकेतील हिस्सेदारी विकण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्यासाठी आता केंद्र सरकार कायदेशीर आणि व्यावहारिक सल्लागाराचा शोध घेत आहे. जेणेकरून या व्यवहारात कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही. यासाठी केंद्र सरकारने 13 जुलैपर्यंत संबंधितांना आपला प्रस्ताव सादर करण्याची मुदत दिली आहे.

संबंधित बातम्या:

RBI च्या निर्णयाने IDBI बँकेची चांदी, गुंतवणूकदारांना फायदाच फायदा

सरकार 57 वर्षे जुनी सरकारी बँक विक्री करण्याच्या तयारीत, जाणून घ्या काय होईल पुढे

खासगीकरण झालेल्या ‘या’ बँकेत 100 रुपयात खातं उघडा, पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार सुविधा

(Disinvestment of NMDC retail investors can bid today)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...