Muhurat Trading 2026: पुढील दिवाळीपर्यंत मिळवा 28% पर्यंत परतावा! जाणून घ्या ‘या’ 6 शेअर्सबद्दल

Muhurat Trading 2026: पुढील दिवाळीपर्यंत कोणते सहा शेअर्स जवळपास 28 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात याबद्दल एचडीएफसी सिक्युरिटीजने यादी तयार केली आहे.

Muhurat Trading 2026: पुढील दिवाळीपर्यंत मिळवा 28% पर्यंत परतावा! जाणून घ्या या 6 शेअर्सबद्दल
Muhurat trading 2026 in diwali
| Updated on: Nov 08, 2026 | 10:46 AM

दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची परंपरा अनेक गुंतवणूकदार जपतात. यंदा ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगच्या पार्श्वभूमीवर HDFC Securities ने गुंतवणूकदारांसाठी सहा शेअर्सची निवड केली आहे. ब्रोकरेजच्या मते, या शेअर्समध्ये पुढील दिवाळीपर्यंत १९ ते २८ टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे.

आजचा मुहूर्त काय?

यंदा बीएसई आणि एनएसईमध्ये रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २:२० ते ३:३० या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगचे विशेष सत्र पार पडणार आहे. नवीन संवत्सराची सुरुवात आणि शुभ मुहूर्तावर गुंतवणुकीची संधी म्हणून या सत्राकडे पाहिले जाते. HDFC Securities ने निवडलेल्या शेअर्समध्ये BPCL, HCL Technologies, IIFL Finance, JSW Steel, Satin Creditcare आणि Zensar Technologies या कंपन्यांचा समावेश आहे. या सहा शेअर्ससाठी ब्रोकरेजने खरेदीची किंमत, संभाव्य लक्ष्य आणि स्टॉप लॉसही निश्चित केला आहे.

Loading...

मुहूर्त ट्रेडिंगसाठी कोणते ६ शेअर्स उत्तम?

१. BPCL – सुमारे २०% परताव्याची शक्यता
तेल आणि वायू क्षेत्रातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) या कंपनीच्या शेअरवर HDFC Securities सकारात्मक आहे.

खरेदीची किंमत: ३०४ ते ३१५ रुपये

पहिला टार्गेट: ३४२ रुपये

दुसरा टार्गेट: ३६६ रुपये

स्टॉप लॉस: २७४ रुपये (क्लोजिंग बेसिसवर)

संभाव्य परतावा: सुमारे २०%

ब्रोकरेजच्या मते, सध्याच्या किमतीच्या आसपास या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास आगामी काळात चांगली वाढ पाहायला मिळू शकते.

२. HCL Technologies – आयटी क्षेत्रातील शेअरवर लक्ष
आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी HCL Technologies देखील ब्रोकरेजच्या पसंतीच्या यादीत आहे. या शेअरमध्ये दीर्घकालीन दृष्टीने तेजीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

खरेदीची किंमत: १,४०५ ते १,४४० रुपये

पहिला टार्गेट: १,५८० रुपये

दुसरा टार्गेट: १,६८६ रुपये

स्टॉप लॉस: १,२५० रुपये (क्लोजिंग बेसिसवर)

संभाव्य परतावा: सुमारे २०%

३. IIFL Finance – २४% पर्यंत वाढीचा अंदाज
आर्थिक सेवा क्षेत्रातील IIFL Finance या कंपनीच्या शेअरमध्येही HDFC Securities ला तेजीची अपेक्षा आहे. ब्रोकरेजने या शेअरसाठी दोन टप्प्यांतील लक्ष्य निश्चित केले आहे.

खरेदीची किंमत: ५७८ ते ६०० रुपये

पहिला टार्गेट: ६७० रुपये

दुसरा टार्गेट: ७२० रुपये

स्टॉप लॉस: ५१० रुपये

संभाव्य परतावा: सुमारे २४%

४. JSW Steel – मेटल क्षेत्रातील शेअरवर ब्रोकरेजचा विश्वास
मेटल क्षेत्रातील प्रमुख कंपनी JSW Steel चा शेअरदेखील या यादीत आहे. कंपनीच्या शेअरमध्ये आगामी काळात जवळपास १९ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज ब्रोकरेजने व्यक्त केला आहे.

खरेदीची किंमत: १,३४० ते १,३८३ रुपये

पहिला टार्गेट: १,५०५ रुपये

दुसरा टार्गेट: १,६०० रुपये

स्टॉप लॉस: १,१९५ रुपये (क्लोजिंग बेसिसवर)

संभाव्य परतावा: सुमारे १९%

५. Satin Creditcare – सर्वाधिक २८% परताव्याचा अंदाज
HDFC Securities च्या सहा शेअर्सच्या यादीत Satin Creditcare या कंपनीचा समावेश असून, या शेअरमध्ये सर्वाधिक म्हणजेच २८ टक्क्यांपर्यंत तेजीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

खरेदीची किंमत: २५६ ते २६५ रुपये

पहिला टार्गेट: ३०० रुपये

दुसरा टार्गेट: ३३० रुपये

स्टॉप लॉस: २२० रुपये

संभाव्य परतावा: सुमारे २८%

६. Zensar Technologies – २५% परताव्याची संधी?
आयटी क्षेत्रातील Zensar Technologies हा शेअरही ब्रोकरेजच्या शिफारसीत आहे. या शेअरमध्ये पुढील दिवाळीपर्यंत २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

खरेदीची किंमत: ५३३ ते ५४८ रुपये

पहिला टार्गेट: ६१५ रुपये

दुसरा टार्गेट: ६६६ रुपये

स्टॉप लॉस: ४६९ रुपये (क्लोजिंग बेसिसवर)

संभाव्य परतावा: सुमारे २५%

कोणत्या शेअरमध्ये किती परताव्याचा अंदाज?

HDFC Securities ने दिलेल्या अंदाजानुसार, या सहा शेअर्समधील संभाव्य परतावा पुढीलप्रमाणे आहे.

BPCL – २०%

HCL Technologies -२०%

IIFL Finance – २४%

JSW Steel- १९%

Satin Creditcare -२८%

Zensar Technologies -२५%

गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मुहूर्त ट्रेडिंगला गुंतवणूक करणे शुभ मानले जात असले, तरी शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. प्रत्यक्ष परतावा बाजारातील परिस्थिती, कंपनीची कामगिरी आणि इतर आर्थिक घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे केवळ मुहूर्त ट्रेडिंगचा विचार करून कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. गुंतवणुकीपूर्वी कंपनीचे आर्थिक निकाल, व्यवसायाची स्थिती, शेअरचे मूल्यांकन आणि स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता तपासणे महत्त्वाचे आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us