AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ED Raid Anil Ambani : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना ED चा मोठा दणका, एकाचवेळी कुठे आणि किती छापे?

ED Raid Anil Ambani : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना ED ने मोठा दणका दिला आहे. राजधानी दिल्ली-मुंबईसह 35 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारीची कारवाई सुरु आहे. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांवर काय आरोप आहेत? येणाऱ्या दिवसात अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढू शकतात.

ED Raid Anil Ambani : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना ED चा मोठा दणका, एकाचवेळी कुठे आणि किती छापे?
Anil Ambani
| Updated on: Jul 24, 2025 | 12:39 PM
Share

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित प्रकरणात प्रवर्तन निर्देशालय (ED) ने गुरुवारी सकाळी एक सर्च ऑपरेशन सुरु केलं. राजधानी दिल्ली, मुंबईसह एकाचवेळी 35 पेक्षा जास्त लोकेशन्सवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरण आहे. हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे. छापेमारीची ही कारवाई प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (PMLA) अंतर्गत होत आहे. या कारवाईत अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 50 कंपन्या आणि 25 पेक्षा जास्त व्यक्तींच्या परिसरात शोधमोहिम सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये ED ला CBI, SEBI, नॅशनल हाऊसिंग बँक, नॅशनल फायनेंशियल रिपोर्टिंग अथॉरिटी (NFRA) आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

CBI ने दोन वेगवेगळ्या FIR नोंदवल्यानंतर ED कडून कारवाई सुरु झाली. या केस RAAGA कंपन्यांशी संबंधित आहेत. या कंपन्या रिलायन्सच्या अनिल अंबानी समूहाशी संबंधित आहेत. FIR नंबर RC2242022A0002 आणि RC2242022A0003 अंतर्गत फसवणूक आणि बँकांकडून चुकीच्या पद्धतीने लोन घेण्याचे गंभीर आरोप आहेत. या FIR च्या आधारावर ED ने चौकशी सुरु केली. त्यातून लक्षात आलं की, सुनियोजित स्कीम अंतर्गच बँका, गुंतवणूकदार आणि सरकारी संस्थांना धोका देण्यात आला आहे. एजन्सीना आपल्या तपासात हे सुद्धा आढळून आलं की, येस बँकेकडून मिळालेली रक्कम कंपनीचे प्रमोटर्स आणि अन्य समूह कंपन्यांमध्ये बेकायद पद्धतीने वळवण्यात आली.

काय धक्कादायक आढळलं?

ED च्या चौकशीत समोर आलेलं हैराण करणारं सत्य म्हणजे 2017 ते 2019 दरम्यान येस बँकेने RAAGA कंपन्यांना कर्ज दिलं. पूर्णपणे नियम डावलून हे कर्ज मंजूर करण्यात आलं. सुरुवातीच्या तपासात समोर आलय की, लोन मंजूर होण्याआधीच येस बँकेच्या प्रमोर्टसना मोठी रक्कम खासगी कंपन्यांमार्फत देण्यात आली. लोनशी संबंधित कागदपत्र, लोन क्रेडिट अप्रूवल मेमोरँडम (CAMs) बॅकडेट तयार करण्यात आलं.

अर्ज आणि मंजुरीची तारीख एकच आढळली

त्याशिवाय ED ला हे सुद्धा आढळून आलं की, लोन तात्काळ दुसरे ग्रुप आणि शेल कंपन्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. लोन त्यांचं कंपन्यांना देण्यात आलं, ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होती. ज्यांचा पत्ता एकसारखा होता, ज्यांचे डायरेक्टर सारखे होते. काही प्रकरणात अर्ज आणि मंजुरीची तारीख एकच आढळली.

सेबीने ED ला दिली महत्त्वाची माहिती

सेबीने या प्रकरणी में RHFL (Reliance Home Finance Limited) बद्दल महत्वाची माहिती ED सोबत शेअर केलीय. SEBI च्या रिपोर्टमध्ये म्हटलय की, 2017-18 मध्ये RHFL ने 3,742.60 कोटी रुपये कॉर्पोरेट लोन दिलेलं. 2018-19 मध्ये हीच रक्कम वाढून 8,670.80 कोटी रुपये झाली.

मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमिततेचा आरोप

या दरम्यान कंपनीने लोन देण्याच्या सगळ्या नियमांकडे दुर्लक्ष केलं. वेगाने मंजुरी दिली. आवश्यक कागदपत्र घेतली नाहीत. अनेकदा कंपन्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्याशिवाय मोठी रक्कम ट्रान्सफर केली. या लोनचा मोठा हिस्सा नंतर प्रमोटर ग्रुपच्या कंपन्यांमध्ये डायवर्ट करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.