
अखेर नाही…हो म्हणता …इलॉन मस्क भाऊंच्या स्टारलिंकला भारतात GMPCS लायसन्स मिळाले आहे. त्यामुळे देशात सॅटलाईट आधारे इंटरनेट सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतू कंपनीला लागलीच सेवा लाँच करता येणार नाही. स्टार लिंक भारतात सॅटेलाईट इंटरनेटसाठी सरकारी लायसन्स मिळविणारी तिसरी कंपनी ठरली आहे. भारतात डोंगर, पर्वत दऱ्या खोऱ्यातील अतिदुर्गम भागातही आता थेट उपग्रहाद्वारे फूल स्पीड नेटवर्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्टारलिंक सॅटेलाईटचे भाडे भारतीयांना परवडणार का असा सवाल केला जात आहे.
एकीकडे इलॉन मस्क यांनी भारतात दिग्गज जिओ नेटवर्क कंपनी असताना Starlink सॅटेलाईट नेटवर्क मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता केवळ लाँचिंगच्या एक पाऊल दुर आहे. गेल्या महिन्यातच स्टारलिंकला लेटर ऑफ इंटेंट मिळाले होते. आता स्टारलिंकला सरकारने GMPCS परवाना दिला आहे.लायसन्स मिळवल्यानंतर आता स्टारलिंक समोर आता एक आव्हान आणखीन आहे. कंपनीला IN-SPACe कडून अंतिम मंजूरी मिळणे बाकी आहे. ही मंजूरी मिळाली की भारतातील लोक सॅटेलाईटद्वारे इंटरनेट सेवा मिळवू शकणार आहेत. परंतू ही शेवटची पायरी पूर्ण करण्यास नेमका किती वेळ लागणार याचा उलगडा झालेला नाही.
विशेष म्हणजे भारतात स्टारलिंकला परवाना मिळण्याआधी दोन कंपन्यांना हे लायसन्स मिळालेले आहे. एक आहे OneWeb आणि दुसरी दिग्गज Reliance यांनी आधीच डाव साधला आहे. त्यामुळे स्टारलिंक हे लायसन्स मिळविणारी तिसरी कंपनी ठरली आहे. हे लायसन्स मिळाले की भारतातही उपग्रहांच्याद्वारे नेटवर्क पुरविण्यात स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना स्वस्तात सॅटेलाईट इंटरनेट मिळेल असे म्हटले जात आहे. स्टारलिंक कंपनीची सेवा सध्या 100 हून अधिक देशात आहे. या कंपनीचा उद्देश्य लेटेंसी ब्रॉडबँडद्वारे वेगवान इंटरनेट सर्व्हीस उपलब्ध करणे हा आहे.
भारतात अतिशय दुर्गम भागात पायाभूत सुविधा नसल्याने इंटरनेट पोहचलेले नाही. परंतू स्टारलिंक आणि इतर कंपन्याचे उपग्रह आधारीत इंटरनेट आले तर ग्रामीण आणि आदिवासी भागाचे कल्याण होणार आहे. या OneWeb, Reliance आणि Starlink या शिवाय Amazon सुद्धा Kuiper प्रोजेक्टद्वारे भारतात सॅटेलाईट इंटरनेट देण्यास उत्सुक आहे.
मीडियातील बातम्यानुसार , भारतात स्टारलिंक प्रमोशनल ऑफरनुसार 10 डॉलर ( सुमारे 840 रुपये ) मध्ये अनलिमिटेड डेटावाला प्लान्स विकू शकतात असे म्हटले जात आहे.