
केंद्र सरकारने पुढील वर्ष २०२४-२५ पर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजाला मंजूरी दिली आहे. यामुळे ईपीएफओ आपल्या सात कोटीहून अधिक खातेधारकांच्या भविष्य निधीवर वार्षिक व्याज जमा करु शकणार आहे. कर्मचाही भविष्य निधी संघटनेने ( ईपीएफओ ) २८ फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्षे २०२४-२५ साठी कर्माचारी भविष्य निधी ( ईपीएफ ) जमा रकमेवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याजदर गेल्या वर्षी दिलेल्या व्याजदरा एवढाच आहे.
स्वीकृत व्याजदरला अर्थ मंत्रालयाच्या मंजूरीसाठी पाठविले होते. कामगार मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ईपीएफवर ८.२५ टक्के व्याजदर देण्यास सहमती दर्शविली आहे.आणि कामगार मंत्रालयाने गुरुवारी ईपीएफओला या संबंधी आदेश दिले होते. आता आर्थिक वर्षे २०२४-२५ साठी स्वीकृती दरानुसार व्याज ईपीएफओच्या सात कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
केंद्रीय कामगार तसेच रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षते खावी २८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत ईपीएफओच्या केंद्रीय न्यास बोर्डाच्या 237वी बैठकीत व्याज दरावर निर्णय घेतला गेला होता. पीएफओने फेब्रुवारी २०२४ मध्ये २०२३-२४ साठी व्याजदरासाठी किरकोळ वाढ करीत ते ८.२५ टक्के केले होते. साल २०२२-२३ मध्ये हे व्याजदर ८.१५ टक्के होते. तसेच मार्च २०२२ मध्ये २०२१-२२ साठी ईपीएफवर व्याजदर घटवून चार दशकाच्या निन्मस्तर ८.१ टक्के केले होते. साल २०२०-२१ मध्ये हे ८.५ टक्के होते.
EPFO चे बॅलन्स चेक करण्याचे चार सोपे पर्याय आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय चार प्रकारे आपले बॅलन्स चेक करु शकता….
SMS पाठवा : तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून या फॉरमॅट मध्ये SMS पाठवा । EPFOHO UAN यास या 7738299899 क्रमांकावर पाठवा..
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरुन या नंबरवर मिस्ड कॉल द्या. 9966044425 वर कॉल आपोआप कट होऊन जाईल आणि तुम्हाला EPF बॅलन्सशी संबंधित SMS प्राप्त होईल.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये UMANG App इन्स्टॉल करा. App मध्ये जाऊन EPFO सर्व्हीस निवडा. नंतर View Passbook पर्यायावर क्लिक करा आणि UAN वरुन OTP ने लॉगिन करा. तुमच्या पासबुक आणि बॅलन्सची संपूर्ण माहीती मिळेल.
EPFO ची अधिकृत वेबसाईट वर जा…। आता Our Services → For Employees → Member Passbook वर क्लिक करा. UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा. तेथे तुमचे संपूर्ण पासबुक दिसेल…