EPFO: देशातील 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता; थेट UPI मधून काढा PF, तांत्रिक चाचणीविषयी मोठी अपडेट… नोकरदारांच्या फायद्याची गोष्ट काय?

EPFO UPI PF Withdrawal: ईपीएफओचे पैसे आता युपीआयद्वारे काढता येणार आहे. देशातील 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. याविषयीची तांत्रिक चाचणी यशस्वी ठरल्याने लवकरच ही सेवा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी केली.

EPFO: देशातील 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता; थेट UPI मधून काढा PF, तांत्रिक चाचणीविषयी मोठी अपडेट... नोकरदारांच्या फायद्याची गोष्ट काय?
ईपीएफओ युपीआय पीएफ
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 21, 2026 | 10:16 AM

EPFO UPI PF Withdrawal: देशातील 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना आता युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस, युपीआय (UPI) वापर करून आपल्या ईपीएफ खात्यातून थेट बँक खात्यात पैसे हस्तांतरीत करता येतील. या सुविधेसाठीची तांत्रिक चाचणी यशस्वी ठरली आहे. लवकरच ही सेवा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी केली.

UPI माध्यमातून थेट पीएफ रक्कम खात्यात

युपीआय ॲपच्या माध्यमातून थेट पीएफची रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल. या सुविधेची तांत्रित चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. युपीआय पिन टाकून ही रक्कम सुरक्षितरित्या ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्यात येईल. श्रमंत्री मनसुख मांडविया यांच्या मते, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही सातत्याने त्यांच्या सेवा अद्ययावत करण्यावर भर देत आहे. त्यासाठी युपीआय पेमेंट गेटवेची तांत्रिक चाचणी यशस्वी ठरली आहे. आता पीएफ युपीआयमार्फत काढता येईल. ही रक्कम थेट सदस्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत होईल. त्यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि गतीशील होईल.

कशी असेल ही प्रक्रिया?

नवीन युपीआय सिस्टिम लागू झाल्यानंतर पीएफ काढणे अधिक सोपे होईल. सदस्यांना युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांकाच्या ( UAN) मार्फत EPFO पोर्टल वा मोबाइल ॲपवर लॉगिन करावे लागेल. लॉगिन झाल्यावर त्यांच्यासमोर खात्यातील एकूण बॅलेन्स आणि काढण्यायोग रक्कम दिसेल. गरजेनुसार सदस्याला योग्य रक्कम काढता येईल. त्यासाठी UPI ID टाकावी लागेल. OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागेल. त्यानंतर पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. अडचणीच्यावेळी कर्मचाऱ्यांना लागलीच हे पैसे झटपट काढता येईल. पण जी रक्कम काढण्यात आली. त्यावर रक्कम काढण्याच्या तारखेपर्यंतचे व्याज मिळेल. त्यानंतर शिल्लक रक्कमेवरील व्याज ग्राह्य धरण्यात येईल.

पीएफ खात्यातून किती रक्कम येईल काढता?

नवीन नियमानुसार, कोणताही कर्मचारी पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकत नाही. कमाल 75% रक्कम कर्मचाऱ्याला काढता येते. त्यासाठी कारणही द्यावे लागते. अत्यावश्यक सेवेसाठी ही रक्कम काढता येते. 25% रक्कम पीएफ खात्यात शिल्लक ठेवणे नियमानुसार गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना ईपीएफ स्कीम योजना 2026, EPS 2026, EDLI Scheme 2026 सारख्या सोयीसुविधा लागू आहेत. त्यामुळे पीएफ, पेन्शन आणि विम्याशी संबंधित नियम अधिक मजबूत झाले आहेत. या सर्व बदलाचा देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Follow Us