
EPFO Pension Calculator : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी कर्मचारी पेन्शन योजना सुरू केली आहे. हा भारतातील सर्वात मोठा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे. कर्मचाऱ्याचा सेवा कालावधी आणि त्याचे वेतन या आधारे कर्मचाऱ्याला पेन्शन देण्यात येते. EPS 16 नोव्हेंबर 1995 मध्ये सुरू करण्यात आली होती. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्याला सेवा निवृत्तीनंतर दरमहा एक ठराविक रक्कम मिळण्यासाठी तरतूद करण्यात आली.
EPS ची खास वैशिष्ट्ये
पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने कमीत कमी 10 वर्षे सेवा बजावणे आवश्यक आहे. जर तुम्ही 10 वर्षांची सेवा पूर्ण केली तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र झाले आहात असा त्याचा अर्थ होतो.
किमान मासिक पेन्शन : 1000 रुपये
कमाल मासिक पेन्शन : 7500 रुपये
EPS साठी काय पात्रता?
EPS पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना 10 वर्षे नोकरी करणे आवश्यक आहे. 58 वर्षानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शनची रक्कम मिळेल. दरमहा ही रक्कम मिळेल. नोकरीच्या काळात दरमहा ईपीएसमध्ये योगदान जमा होते. त्याआधारे पेन्शन देण्यात येते. ईपीएफमध्ये मुळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम दरमहा जमा होते. कंपनीच्या योगदानात दोन हिस्से पडतात. 8.33% कर्मचारी पेन्शन स्कीममध्ये, तर 3.67% कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसा जमा होतो. 2014 मध्ये केंद्र सरकारने EPS-1995 अंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपये दरमहा तर अधिकत्तम पेन्शन प्रतिमहा 7500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली.
EPFO Pension Calculator Formula
मासिक पेन्शन = (पेन्शन पात्र वेतन × पेन्शन पात्र सेवा) / 70
पेन्शन पात्र वेतन = अखेरच्या 60 महिन्यांच्या वेतनाची सरासरी
पेन्शन पात्र वेतन = सेवा काळात ईपीएसमधील योगदान
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे पेन्शन पात्र वेतन 15000 रुपये आहे त्याचे पेन्शन पात्र कालावधी, सेवा जर 10 वर्षे असेल तर या सूत्रानुसार,
मासिक पेन्शन (15,000 रुपये × 10) / 70 = 2,143 रुपये
म्हणजे जर एखाद्याने 10 वर्षे नोकरी केली तर सेवा निवृत्तीनंतर ती व्यक्ती निवृत्ती रक्कम मिळण्यास पात्र ठरतो.
नोकरी सोडल्यानंतर तीन वर्षे व्याज
समजा तुम्ही नोकरी सोडली तर तुमच्या पीएफमधील रक्कमेवर तीन वर्षे व्याज मिळेल. म्हणजे जी तुमची नोकरीची अंतिम कंपनी असेल तिने जी रक्कम जमा केलेली आहे. त्याच रक्कमेवर व्याज मिळेल. तीन वर्षांनंतर तुम्ही नवीन नोकरी स्वीकारली नाही अथवा ही रक्कम काढली नाही तर त्यावर व्याज मिळणार नाही. तुमचे पीएफ खाते निष्क्रिय राहील. तुमची रक्कम तशीच पडून राहील. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने 8.25 टक्के व्याजदर निश्चित केलेला आहे. हा व्याजदर नेहमी बदलतो.