सोन्याच्या प्रत्येक दागिन्यांना एक युनिक आयडी मिळणार, सरकारची जबरदस्त योजना

| Updated on: Sep 25, 2021 | 5:54 PM

दागिन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा फसवणूक झाल्यास ज्वेलर्सचे दुकान आणि हॉलमार्किंग सेंटरवर कारवाई करणे सोपे जाणार आहे. दागिन्यांची शुद्धता राखण्यासाठी आणि ग्राहकांना भेसळयुक्त सोने मिळू नये, यासाठी सरकारला प्रत्येक दागिन्यावर युनिक आयडी देण्याची इच्छा आहे. हा युनिक आयडी HUID म्हणून ओळखला जाईल.

सोन्याच्या प्रत्येक दागिन्यांना एक युनिक आयडी मिळणार, सरकारची जबरदस्त योजना
Follow us on

नवी दिल्लीः हॉलमार्किंग धोरण सरकारनं अनिवार्य केल्यानं देशातील सुवर्णकार व्यापारी आणि दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. दागिन्यांचा व्यवसाय चालवणाऱ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने हे पाऊल उतावीळपणे उचललेय. संपूर्ण देशात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगची सर्वसमावेशक रचना तयार होईपर्यंत सरकारनं हा निर्णय लागू करायला नको. दुसरीकडे सरकार मानते की, नियम लागू केले गेले आणि हॉलमार्किंगचे काम चालू राहिल्यानंतरही पायाभूत सुविधा तयार होऊ शकतात. दागिन्यांवरील हॉलमार्किंग एक युनिक आयडी असेल, ज्याला तांत्रिक भाषेत हॉलमार्किंग युनिक आयडी किंवा एचयूआयडी म्हणून ओळखले जाईल.

युनिक आयडी हॉलमार्किंग सेंटरशी जोडला जाणार

हे HUID त्या दुकानाशी जोडले जाईल, जिथून दागिने विकले जातील. हा युनिक आयडी हॉलमार्किंग सेंटरशी जोडला जाईल, जिथून अचूकतेवर शिक्कामोर्तब होईल. या दोन प्रकारच्या आयडींचा मोठा फायदा असा होईल की, कोणत्या दुकानातून आणि कोणत्या केंद्रातून दागिने बाहेर पडले आहे हे दागिने शोधण्यात सरकार सक्षम असेल. दागिन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा फसवणूक झाल्यास ज्वेलर्सचे दुकान आणि हॉलमार्किंग सेंटरवर कारवाई करणे सोपे जाणार आहे. दागिन्यांची शुद्धता राखण्यासाठी आणि ग्राहकांना भेसळयुक्त सोने मिळू नये, यासाठी सरकारला प्रत्येक दागिन्यावर युनिक आयडी देण्याची इच्छा आहे. हा युनिक आयडी HUID म्हणून ओळखला जाईल.

HUID म्हणजे काय?

HUID (गोल्ड हॉलमार्क युनिक आयडी) हा एक नंबरसारखा आहे, जो तुमच्या आधार किंवा पॅन सारखा असू शकतो. HUID अंतर्गत प्रत्येक दागिन्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो. हा आयडी सांगेल की, दागिने कोठून विकले गेले आणि विकल्यानंतर ते कोणाच्या हातात गेले. कोणत्या सोनाराने हे दागिने विकले, कोणत्या खरेदीदाराने ते विकत घेतले, ते दागिने काही लॉकरमध्ये ठेवले होते, ते वितळले गेले आणि पुन्हा दागिने बनवले गेले आणि पुढे विकले गेले. ही सर्व माहिती त्या HUID मध्ये नोंदवली जाईल.

सरकारला तपशील का हवे आहेत?

सरकारला सर्व प्रकारचे दागिने किंवा सोन्याची विटा, बिस्किटे किंवा बार शोधायचे आहेत, जेणेकरून देशात सोने कोठून येत आहे हे कळू शकेल. सोन्याचा सर्वात मोठा वापर तस्करीसाठी होतो आणि त्यातून काळा पैसा तयार करणे खूप सोपे जाते. HUID च्या माध्यमातून सरकारला सोन्याचा खरा विक्रेता कोण आहे हे कळू शकेल. जर विक्रेता ओळखला गेला तर फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. यासह ग्राहकांना शुद्ध सोने मिळेल आणि सरकारदेखील त्यावर कमाई करेल. सोन्याच्या तस्करीच्या नावाखाली करचोरी थांबवली जाईल.

सोनार का विरोध करत आहात?

पहिल्या दृष्टीक्षेपात ज्वेलर्स किंवा सोनार सरकारच्या हॉलमार्किंग (गोल्ड हॉलमार्क युनिक आयडी) चा थेट विरोध करत असल्याचे दिसत नाही. जर तुम्ही थेट विरोध केला, तर लोक म्हणतील की त्यांनाही भ्रष्टाचाराला प्रोत्साहन द्यायचे आहे. हेच कारण आहे की, देशभरात HUID विरुद्ध प्रचार होत आहे. सुवर्णकार म्हणतात की, सध्या देशात हॉलमार्किंगसाठी पुरेशी पायाभूत सुविधा उपलब्ध नाही आणि सरकारने हे पाऊल उतावीळपणे उचललेय. ज्वेलर्स असेही म्हणतात की, सरकारने आधी हा नियम हॉलमार्किंग सेंटरसाठी बनवला होता, पण नंतर दुकानदारांसाठी देखील ते अनिवार्य केले गेले. ते फक्त हॉलमार्क केलेले दागिने विकू शकतील.

ज्वेलर्स काय म्हणतात?

सुवर्णकार किंवा ज्वेलर्स म्हणतात की, देशात हॉलमार्किंग केंद्रांची संख्या मर्यादित आहे आणि दागिन्यांची मागणी तशीच आहे. यामुळे केंद्रांवर हॉलमार्किंगचा दबाव वाढेल आणि यादीत गोंधळ होईल. ज्वेलर्स हॉलमार्क केल्यावरच बाहेर येऊ शकतील. या संपूर्ण प्रक्रियेत विलंब होईल, त्यामुळे ग्राहक आणि दुकानदार दोघांनाही विलंबाचे परिणाम भोगावे लागतील.

संबंधित बातम्या

चांगली बातमी! नोकऱ्यांची चंगळ, जुलैमध्ये ESICकडून 13.21 लाख नवे सदस्य आणि EPFO कडून 14.65 लाख नवे सदस्य

पगारदारांसाठी महत्त्वाची बातमी! UAN ते आधार लिंकची तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली

Every gold ornament will get a unique ID, a hefty government scheme