Palm Oil Export Ban : आजपासून इंडोनेशियाकडून होणारी पाम तेलाची निर्यात बंद, भारतावर काय परिणाम होणार?

| Updated on: Apr 28, 2022 | 7:23 AM

देशात वाढत असलेल्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी इंडोनेशियाने (Indonesia) 28 एप्रिल म्हणजे आजपासून पाम ऑईल (Palm Oil) ची निर्यात बंद केली आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे.

Palm Oil Export Ban : आजपासून इंडोनेशियाकडून होणारी पाम तेलाची निर्यात बंद, भारतावर काय परिणाम होणार?
खाद्यतेल
Follow us on

Indonesia Palm Oil Export Ban: देशात वाढत असलेल्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी इंडोनेशियाने (Indonesia) 28 एप्रिल म्हणजे आजपासून पाम ऑईल (Palm Oil) ची निर्यात बंद केली आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारत गरजेच्या जवळपास 50 ते 60 टक्के पाम तेल इंडोनेशियामधून आयात करतो. अशा परिस्थितीमध्ये इंडोनेशियाकडून येणारी तेलाची आवक पूर्णपणे ठप्प झाल्याने येणाऱ्या काळात भारताला तेलाचा तुटवडा जाणू शकतो. तेलाचे दर आधीच गगनाला भिडले आहे, ते आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यात आणखी भर म्हणजे सध्या रशिया (Russia) आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. आपण युक्रेनकडून गरजेच्या सुमारे सत्तर टक्के सुर्यफूलाचे तेल आयात करतो. मात्र युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनकडून येणाऱ्या तेलाचा पुरवठा देखील प्रभावित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पाम तेल निर्यात बंदीची घोषाणा केली होती, त्यानुसार आजपासून निर्यात बंद करण्यात आली आहे.

भारतावर काय परिणाम होणार?

भारत दरवर्षी इंडोनेशिया आणि मलेशियाकडून आठ मिलियन टनापेक्षा अधिक पाम तेलाची आयात करतो. आजपासून इंडोनेशियाने निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तेलाचा पुरवठा प्रभावित होणार आहे. भारत इंडोनेशियाकडून गरजेच्या सत्तर टक्के तर मलेशियाकडून तीस टक्के पाम तेलाची आयात करतो. अशा परिस्थितीमध्ये जर इंडोनेशियाकडून येणारा पाम तेलाचा पुरवठा बंद झाल्यास भारतामध्ये तेलाचे दर आणखी वाढू शकतात. आधीच सुर्यफूल आणि सोयाबिन तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. पाम तेलाचा उपयोग केवळ खाण्यासाठीच नाही तर त्याचा उपयोग साबन, शाम्पू यासारख्या सौंदर्यप्रसाधनामध्ये देखील केला जातो. त्यामुळे आता शांपू, साबत यासारख्या वस्तूंचे भाव देखील वाढू शकतात.

आयातीसाठी दुसऱ्या देशांचा पर्याय

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आधीच सुर्यफुलाचे तेल महाग झाले आहे. देशात सुर्यफुलाच्या तेलाचा तुटवडा आहे. त्यात आता इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात बंद केली आहे. त्यांमुळे देशात तेलाचा तुटवाडा निर्माण होऊन महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताला आता तेल आयातीसाठी दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. दुसऱ्या देशातून तेल आयात करून गरज पूर्ण करावी लागणार आहे, तर तेलाचे दर नियंत्रणात राहू शकतील.