FACT CHECK: 12 हजार गुंतवा, 4 कोटी मिळवा; RBI च्या ‘या’ व्हायरल मेलनं इनबॉक्स फुल्ल!

रिझर्व्ह बँकेद्वारे वैयक्तिक माहिती ग्राहकांकडून मागण्याची तरतूद नाही. त्यामुळे तुम्हाला अशाप्रकारे वैयक्तिक माहितीची विचारणा केली जात असल्यास माहिती सार्वजनिक करू नका.

FACT CHECK: 12 हजार गुंतवा, 4 कोटी मिळवा; RBI च्या ‘या’ व्हायरल मेलनं इनबॉक्स फुल्ल!
रिझर्व्ह बँकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 7:46 PM

नवी दिल्ली- केवळ 12500 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा 4 कोटी! रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या ईमेलने सर्वांचे इनबॉक्स फुल्ल होत आहे. तुम्ही कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नावे बनावट मेल व्हायरल होत आहे. केंद्रीय माध्यम संस्थेनं (पीआयबी) (PIB) ईमेल बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे. रिझर्व्ह बँकेद्वारे वैयक्तिक माहिती ग्राहकांकडून मागण्याची तरतूद नाही. त्यामुळे तुम्हाला अशाप्रकारे वैयक्तिक माहितीची विचारणा केली जात असल्यास माहिती सार्वजनिक करू नका. अन्यथा तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. रिझर्व्ह बँकेकडून वैयक्तिक माहितीसाठी विचारणा केली जात नाही. रिझर्व्ह बँकेत वैयक्तिक खाते (PERSONAL ACCOUNT) उघडले जात नाही. कोणत्याही प्रकारे पैशांची देवाणघेवाण केली जात नाही.

वापरा खात्रीशीर स्त्रोत:

रिझर्व्ह बँकेने लोकांना सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेची एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे. त्यावर बँकेद्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाते. त्यामुळे बँकांच्या उपक्रमाविषयी ग्राहकांनी नेहमी रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत स्त्रोतांचा वापर करायला हवा असे बँकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अफवांपासून सावध राहा

पीआयबीनं फॅक्ट चेकच्या माध्यमातून दाव्याची सत्यता पडताळली आहे. व्हायरल मेसेज होणारा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबतची कोणतीही योजना आखलेली नाही. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशा प्रकारच्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

मेसेजपासून सावध राहा

पीआयबी फॅक्ट चेकनंतर हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले जात आहे. लिंकवर क्लिक करण्याद्वारे कुणीही खासगी बँकिंग संबंधित माहिती सार्वजनिक करू नये. बँक खात्याचे तपशीलांची माहिती दिल्यास मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.

कसं कराल फॅक्ट चेक?

तुमच्याकडे अशाच स्वरुपाचे मेसेज येत असल्यास अशाप्रकारच्या मेसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्हाला पीआयबीच्या माध्यमातून फॅक्ट चेकचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक https://factcheck.pib.gov.in/ वर क्लिक करावे लागेल. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल pibfactcheck@gmail.com यावर तथ्य शोधन करू शकतात.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.