मोबाईलप्रमाणे पोर्ट होईल Fastag, फास्टॅग स्टीकर न हटवता, बदला बँक, कसं पोर्ट करता येणार?

FASTag Port Sticker Onetag: आता मोबाईल क्रमांकाप्रमाणे FASTag सुद्धा पोर्ट करता येईल. OneTag सुविधेमुळे नवीन फास्टॅग न खरेदी करता बँक बदलता येणार आहे. फास्टॅग पोर्ट करण्याची पद्धत आणि कोणत्या बँकांकडून मिळणार ही सुविधा? जाणून घ्या.

मोबाईलप्रमाणे पोर्ट होईल Fastag, फास्टॅग स्टीकर न हटवता, बदला बँक, कसं पोर्ट करता येणार?
मोबाईलप्रमाणे पोर्ट होईल Fastag
| Updated on: Sep 12, 2026 | 3:07 PM

जर तुमच्या कारच्या विंडशील्डवरील फास्टॅग चांगलं काम करत असेल आणि तुम्हाला बँक बदलायची असेल तर आता मोठी सुविधा निर्माण झाली आहे. आता नवीन फास्टॅग घ्यायची गरज नाही. जुन्या फास्टॅगची बँक तुम्हाला बदलता येणार आहे. केंद्र सरकारने OneTag नावाने नवीन सुविधा सुरू केली आहे. त्याआधारे फास्टॅग एका बँकेतून दुसर्‍या बँकेत सहज पोर्ट करता येईल. ही सुविधा मोबाईल नंबर पोर्ट केल्यासारखीच आहे. फास्टॅगचे स्टिकर तसेच राहील. फक्त त्याच्याशी संबंधित बँक बदलता येईल. ही सुविधा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 11 सप्टेंबर रोजी सुरू केली.

काय आहे OneTag?

OneTag, ही फास्टॅगची पोर्टेबिलिटी सुविधा आहे. त्यानुसार, वाहन मालक सध्याचे फास्टॅग न हटवता दुसर्‍या बँकेशी ते जोडू शकतो. यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीाल फास्टॅगची बँक बदलायची असेल तर त्याला जुने फास्टॅग बंद करावे लागत होते आणि नवीन फास्टॅग खरेदी करावे लागत होते. त्याला जुने स्टिकर हटवून नवीन स्टिकर लावावे लागत होते. आता ही समस्याच दूर झाली आहे. युझर्सला फास्टॅगची बँक सहज बदलता येणार आहे.

फास्टॅगची बँक बदलून कसे पोर्ट करता येईल?

सर्वात अगोदर राजमार्ग यात्रा हे ॲप उघडा

होमपेजवर देण्यात आलेल्या OneTag चा पर्याय निवडा

सध्याच्या फास्टॅगची माहिती नोंदवा

ज्या नवीन बँकेसोबत फास्टॅग लिंक करायचे आहे, ती निवडा

आता पडताळणी करा

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फास्टॅग नवीन बँकेसोबत लिंक होईल आणि वापरता येईल

पण पोर्ट करण्यापूर्वी नवीन बँक OneTag पोर्टेबिलिटी सिस्टिममध्ये सहभागी आहेत की नाही ते तपासा

नवीन फास्टॅग खरेदी करावे लागेल का?

OneTag ची एक खास गोष्ट म्हणजे नवीन फास्टॅग स्टिकर खरेदी करण्याची गरज नाही. कारच्या विंडशील्डवर सध्याचा जो फास्टॅग आहे, ते फेकून देण्याची गरज नाही. तुम्हाला जुने फास्टॅग नवीन बँकेसोबत लिंक करता येईल. OneTag सिस्टिममध्ये अनेक मोठ्या बँका जोडलेल्या आहेत. यामध्ये एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एअरटेल पेमेंट सारख्या बँकांचा समावेश आहे. येत्या काळात या सिस्टिमसोबत अजून बँका आणि प्लॅटफॉर्म जुळण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडे जास्त पर्याय असतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us