मोदी सरकारच्या निर्णयांमुळे विमा क्षेत्राला सुगीचे दिवस, कंपन्यांचे नशीब पालटणार?

| Updated on: Feb 09, 2021 | 9:03 PM

पहिल्यांदाच भारतीय विमा कंपन्यांमधील मालकी हक्काइतका हिस्सा विकत घेण्याचा परदेशी कंपन्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. | Insurance sector

मोदी सरकारच्या निर्णयांमुळे विमा क्षेत्राला सुगीचे दिवस, कंपन्यांचे नशीब पालटणार?
Insurance
Follow us on

नवी दिल्ली: विमा क्षेत्रात 74 टक्के परकीय गुंतवणुकीला (FDI) मान्यता देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे परकीय गुंतवणुकदार या क्षेत्रात आणखी रस घेतील. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमा कंपन्याही भारतामध्ये प्रवेश करतील. यामुळे बाजारपेठेत स्पर्धा वाढून ग्राहकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. (Major changes will happen in Insurance sector in future)

मोदी सरकारच्या निर्णयामुळे काय बदल होणार?

केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढली. परिणामी पहिल्यांदाच भारतीय विमा कंपन्यांमधील मालकी हक्काइतका हिस्सा विकत घेण्याचा परदेशी कंपन्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, हा निर्णय घेताना केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांना काही अटही घातली आहे. या विमा कंपन्यांचे प्रमुख व्यवस्थापन कर्मचारी आणि संचालक मंडळाचे सदस्य निवासी भारतीय हवेत. तसेच संचालक मंडळात स्वतंत्र निर्देशकांचा समावेश असावा.

परकीय गुंतवणुकीला चालना मिळणार

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विमा क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर परकीय गुंतवणूक येऊन या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. त्यासाठी केंद्र सरकारकडून विदेशी मालकीच्या नियमातही सूट दिली जाऊ शकते. बाजारपेठेत परकीय भांडवल आल्यामुळे वितरकांचे जाळे विस्तारण्यास आणि डिजिटलीकरणाच्या प्रक्रियेला आणखी वेग येईल.

तसेच मार्केटिंग आणि ग्राहक सेवा क्षेत्रात आणखी सुधारणा करण्यासाठी नव्या भांडवलाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात विमा क्षेत्राचा विकास झपाट्याने होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

लॉकडाऊन काळात टाईमपास म्हणून प्रयोग केला, आता घरीबसल्या बक्कळ कमाई!

क्रिप्टोकरन्सी बिल अंतिम टप्प्यात, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवलं जाणार

खाजगीकरणाविरोधात बँकांचा दोन दिवस संप, मार्च महिन्यात संपाची घोषणा

(Major changes will happen in Insurance sector in future)