लॉकडाऊन काळात टाईमपास म्हणून प्रयोग केला, आता घरीबसल्या बक्कळ कमाई!

लॉकडाऊन काळातल्या अनेकांच्या अनेक आठवणी आहेत (Swati Purohit Started baking cake in lockdown)

लॉकडाऊन काळात टाईमपास म्हणून प्रयोग केला, आता घरीबसल्या बक्कळ कमाई!

जोधपूर (राजस्थान) : लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांना घरी थांबावं लागलं. या लॉकडाऊन काळातल्या अनेकांच्या अनेक आठवणी आहेत. अनेकांना घरात राहून कंटाळा आला. वेळ घालवण्यासाठी अनेकांनी घरात राहून वेगवेगळे प्रयोग केले. काहींनी स्वयंपाक बनवला तर काहींनी आपल्या कलेचा वापर करुन नव्या उद्योगाला सुरुवात केली. असाच काहीसा प्रयोग राजस्थानच्या जोधपूर येथील महिला स्वाती पुरोहित यांनी केला. विशेष म्हणजे त्यांना या प्रयोगात यश मिळालं. त्या आज यशस्वी उद्योजिका बनल्या. स्वाती यांचा एक गृहिणी ते यशस्वी उद्योजिकाचा प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (Swati Purohit Started baking cake in lockdown).

स्वाती यांना स्वयंपाक बनवण्याचा छंदच आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी केक बनवण्याचा विचार केला. त्यांनी यू-ट्यूबवर केक कसा बनवतात? याचं प्रशिक्षण घेतलं. व्हिडीओ पाहता-पाहता त्यांनी एक-दोन वेळा केकही तयार केला. त्यांच्या केकचा प्रयत्न यशस्वी झाला. आता स्वाती यांचा केक अनेकांना आवडतो. जोधपूरला अनेक लोक लांबून त्यांच्या इथे केक खरेदी करण्यासाठी येतात. स्वाती यांनी बनवलेल्या थीम केकला लोकांनी जास्त पसंती दिली आहे. स्वाती यांनी स्वत: आपल्या प्रवासाबाबत माहिती दिली (Swati Purohit Started baking cake in lockdown).

व्यवसाय कसा सुरु केला?

“मी लॉकडाऊन काळात घरी केक बनवला. त्या केकची डिझाईन एकदम युनिक होती. मी त्या केकचा फोटो सोशल मीडियावर टाकला. हा फोटो माझे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी पाहिला. त्यानंतर काही नातेवाईकांनी मला पुन्हा केक बनवण्याचा आग्रह केला. त्यांनीदेखील त्या केकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनादेखील केक आवडला. अखेर जुलै 2020 मध्ये मला पहिली केकची ऑफर आली. तो केक ग्राहकांना आवडला. त्यांनी केकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अशाप्रकारे ग्राहकांची चैन बनत गेली. लोकांचा इतका चांगला प्रतिसाद येईल असं मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. लोकांचा प्रतिसाद पाहता मी घरातूनच व्यवसाय सुरु केला”, असं स्वाती यांनी सांगितलं.

स्वाती किती पैसे कमावतात?

स्वाती यांना स्वयंपाक बनवण्याचा छंद आहे. त्यामुळे त्या घरकाम सांभाळत केकचा पार्ट टाईम बिझनेस करतात. यासाठी त्यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक पेज सुरु केलं आहे. या पेजवर ते त्यांच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या केकचे फोटो शेअर करतात. या पेजच्या माध्यमातून अनेक लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. अनेकजण त्यांना तिथूनच ऑर्डर देतात. स्वाती यांना सध्या दिवसाला दोन-तीन केकच्या ऑर्डर येतात. एका केकची किंमत 700 ते 1500 रुपयांपर्यंत आहे. यापैकी थीम केकसाठी स्वाती जास्त पैसे घेतात. त्यांनी घरगुती सुरु केलेल्या या व्यवस्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकापर्यंत जसजशी माहिती पोहोचत आहे, तसतशी त्यांची ऑर्डर वाढत आहे.

हेही वाचा : अनिल देशमुखांकडून बलात्काऱ्यांना क्लीन चिट; चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI