अनिल देशमुखांकडून बलात्काऱ्यांना क्लीन चिट; चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

अनिल देशमुख बलात्काऱ्यांना क्लीन चिट देत आहे," असा आरोप चित्रा वाघ यांनी दिला आहे. (Chitra Wagh Criticism Anil Deshmukh)

अनिल देशमुखांकडून बलात्काऱ्यांना क्लीन चिट; चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप
चित्रा वाघ अनिल देशमुख

मुंबई : “राज्यात दररोज बलात्काराच्या घटना घडत आहेत. भंडाऱ्यात लहान बालकांचा मृत्य असो किंवा यवतमाळमधील घटना असो. या सर्व घटना होऊनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी फिरकलेही नाही. गृहमंत्री अनिल देशमुख बलात्काऱ्यांना क्लीन चिट देत आहे,” असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे. (Chitra Wagh Criticism Home Minister Anil Deshmukh)

“गेल्या 31 डिसेंबर 2020 ला भंडाऱ्यात घडलेली घटना धक्कादायक होती. त्यानंतर यवतमाळमध्ये पोलिओ ड्रॉपऐवजी सॅनिटायझर दिल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये शासनाचा हलगर्जीपणा समोर येतो. याबाबतची चौकशी समिती स्थापन केलेली नाही. संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या ठिकाणी फिरकलेही नाही.”

“भंडाऱ्यात एवढी गंभीर घटना घडूनही अजून कसलीही कारवाई झालेली नाही. FIR दाखल झालेला नाही. केवळ पाच लाख रुपये दिले, म्हणजे चालतं का? हे सरकार बालकांचं हत्यारं आहे,” असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

गृहमंत्री बलात्कारांना क्लीन चिट देतात?

“खारघरमध्ये महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाला. पुण्यातही अशाप्रकरची घटना घडली. साताऱ्यातही मुकबधीर मुलीवर बलात्कार झाला. पण सरकार याची दखल घेत नाही. आम्ही बलात्कार किंवा महिलांवर अन्याय झालेल्या घटनांची तात्काळ दखल घेतो. पण गृहमंत्री बलात्कारांना क्लीन चिट देत आहे,” असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.

“बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत. खारघरमधील एका बलात्कार प्रकरणाचं कनेक्शन सत्ताधारी मंत्र्यांच्या जवळ जातं, अशी आमची खात्रीलायक माहिती आहे औरंगाबाद प्रकरणाचं पुढे काय झालं, स्वत: पोलीसच आरोपीला वाचवत असतील तर?” असा सवालही चित्रा वाघ यांनी केला. (Chitra Wagh Criticism Home Minister Anil Deshmukh)

संबंधित बातम्या : 

मुंबई जिंकण्यासाठी भाजपचा हळदी कुंकवावर भर; सत्तेची हळद लागणार का?

महाविकासआघाडीचे सरकार बालकांचं हत्यारं आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारं, चित्रा वाघ यांची टीका

Published On - 5:13 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI