New GST Reform List : जीएसटीत बदल, काय स्वस्त, काय महाग? वाचा एकाच क्लिकवर संपूर्ण यादी

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची बैठक घेतली. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेऊन सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा देण्यात आलाय. काही गोष्टींवर आता अजिबातच जीएसटी हा तुम्हाला भरावा लागणार नाहीये.

New GST Reform List : जीएसटीत बदल, काय स्वस्त, काय महाग? वाचा एकाच क्लिकवर संपूर्ण यादी
Nirmala Sitharaman
| Updated on: Sep 04, 2025 | 9:47 AM

नुकताच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेत सर्वसामान्यांना एक दिसला देण्याचे काम करण्यात आले. मागील काही दिवसांपासून महागाई ही सातत्याने वाढताना दिसत आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात जीएसटी लावल्याचे बघायला मिळतंय. यामुळे सर्वसामान्य लोकांना दैनंदित जीवनातील वस्तू खरेदी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत आहेत. यासोबतच नोकरदारांना टॅक्स देखील वाढवण्यात आला. या महागाईच्या काळात थोडासा दिलासा आता सरकारकडून देण्यात आला आहे. काही वस्तूंवरून जीएसटीतील 12 आणि 28 टक्के हे स्लॅब काढून टाकले आहेत. आता तुमच्या दैनंदित जीवनातील अनेक वस्तू तुम्हाला स्वस्तात म्हणणार आहेत. काय स्वस्त होणार आणि काय महागणार याची संपूर्ण यादी वाच.

या वस्तू होणार स्वस्त: 

चपाती, तंदूर रोटी, दूध, पिझ्झा, आैषधे, आरोग्य विमा, पनीर पराठा, शार्पनर, पेन्सिल, वह्या, चार्ट, खोडरबर, नकाशे, दुर्मिळ आजारांच्या गोळ्या यावर एक टक्काही जीएसटी लागणार नाहीये. तेल, शाम्पू, इलेक्ट्रीक गाड्या, ब्रश, टूथपेस्ट, ब्रश, साबण, बटर, तूप, चीज, चिवडे, भूजिया, डायपर, थर्मोमीटर, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रीप्स, चष्मे, रोगनिदानाची उपकरणे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे टायर्स, सुटे भाग, जलसिंचन, तुषारसिंचनाची उपकरणे, शिलाई मशि, दुधाची बाटली या वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागेल.

या वस्तू होणार महाग: 

गाड्या, महागड्या कार, महागड्या विदेशीत बाईक, पान मसाला, शितपेय, सर्व पॅकेज्ड पेय हे आता महाग होणार आहेत. दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी हा सरकारकडून हटवण्याच निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासोबतच लग्झरी गोष्टींवरील जीएसटी हा चांगलाच वाढवल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे जर तुमचे आलिशान गाडी किंवा बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावी लागणार हे स्पष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा नारा दिला होता. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारतीय बाजारपेठेत स्वदेशी वस्तूंची विक्री जास्त व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, नुकताच आता जीएसटीमधून घरात दररोज लागणाऱ्या वस्तूंमध्ये मोठी सूट देऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.