AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरच्या RTO अधिकाऱ्याने ₹22 रॅपिडो राईड केली बुक; ड्रायव्हर पिक करण्यासाठी आला अन् पुढे जे घडले ते ऐकून बसेल धक्का

महाराष्ट्र परिवहन विभागाने परवान्याशिवाय आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांविरुद्ध एक मोठी मोहीम सुरू केली आहे. नागपूरमध्ये, एका आरटीओ अधिकाऱ्याने अतिशय पिल्मी पद्धतीने सापळा रचून रॅपिडो कंपनीला धारेवर धरले आहे.

नागपूरच्या RTO अधिकाऱ्याने ₹22 रॅपिडो राईड केली बुक; ड्रायव्हर पिक करण्यासाठी आला अन् पुढे जे घडले ते ऐकून बसेल धक्का
rapido
| Updated on: Jul 05, 2026 | 12:22 PM
Share

महाराष्ट्र परिवहन विभागाने परवान्याशिवाय आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांविरुद्ध एक मोठी आणि अत्यंत अत्याधुनिक मोहीम सुरू केली आहे. नागपूरमध्ये, एका आरटीओ अधिकाऱ्याने स्वतः ग्राहक असल्याचे भासवून फक्त 22 रुपयांमध्ये एक राईड बुक केली. यानंतर जे घडले त्यामुळे रॅपिडो कंपनीला धक्का बसला. असे काही सुरु असू शकते याची कल्पनाही करु शकत नाही. गुप्त कारवाईनंतर, रॅपिडो ॲप चालवणाऱ्या कंपनीचे संस्थापक ऋषिकेश एसआर, पवन गुंटुपल्ली आणि अरविंद संका यांच्याविरुद्ध नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरटीओने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, रॅपिडो ॲपची मूळ कंपनी असलेल्या रुपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला राज्यात पेट्रोलवर चालणारी बाईक टॅक्सी सेवा चालवण्यासाठी महाराष्ट्र सरकार किंवा आरटीए कोणतीही परवानगी किंवा कायदेशीर परवाना मिळालेला नाही. मात्र, ही कंपनी व्यावसायिक कारणांसाठी खाजगी पेट्रोल बाईक्सचा वापर करत आहे.

नेमकं काय घडलं?

ही संपूर्ण घटना 23 जूनची आहे, जेव्हा नागपूर आरटीओने बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात एक विशेष मोहीम सुरू केली होती. या मोहिमेचा एक भाग म्हणून, मोटार वाहन निरीक्षक विशाल मधुकरराव भवाटे यांनी त्यांच्या मोबाईल फोनवरील रॅपिडो ॲप वापरून, रवी भवन ते प्रियदर्शनी कॉलनीपर्यंत फक्त 22 रुपयांच्या भाड्यात वैयक्तिकरित्या बाईक राईड बुक केली. थोड्याच वेळात, ठरलेल्या पिकअप पॉईंटवर एक बाईक थांबली. आरटीओ अधिकारी बाईकमध्ये बसताच, पथकाने त्याला घेरले. तपासणीसाठी ते वाहन आरटीओ कार्यालयात नेण्यात आले. तपासात असे उघड झाले की, आवश्यक व्यावसायिक परवाने आणि पांढरी नंबर प्लेट असलेली दुचाकी टॅक्सी म्हणून वापरली जात होती. आरटीओने ती बाईक जप्त केली.

रॅपिडोच्या तीन प्रवर्तकांवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 318(3) आणि 3(5) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 66, 93, 192अ, 913 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, अॅपद्वारे बेकायदेशीर नेटवर्क चालवण्यासाठी आयटी कायद्याच्या कलम 66(d) चा देखील समावेश करण्यात आला आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु