Flagship Fest Sale : Iphone 11, Motorola Razr 5G सह Vivo-Oppo च्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट

| Updated on: Apr 12, 2021 | 5:58 PM

वॉलमार्ट अधिकृत फ्लिपकार्टने (Walmart owned Flipkart) त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फ्लॅगशिप फेस्ट सेल (Flagship Fest Sale) आयोजित केला आहे.

Flagship Fest Sale : Iphone 11, Motorola Razr 5G सह Vivo-Oppo च्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट
Follow us on

मुंबई : वॉलमार्ट अधिकृत फ्लिपकार्टने (Walmart owned Flipkart) त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फ्लॅगशिप फेस्ट सेल (Flagship Fest Sale) आयोजित केला आहे. आजपासून हा 4 दिवसांचा सेल सुरू झाला असून तो 15 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना फ्लॅगशिप स्मार्टफोनवर बम्पर सूट मिळू शकते. या यादीमध्ये ज्या स्मार्टफोनमध्ये सूट देण्यात येत आहे, त्यात अ‍ॅपल, सॅमसंग, व्हिवो, शाओमी आणि इतर ब्रँडचा समावेश आहे. (Flipkart Flagship Fest Sale : Big discounts Iphone 11, Motorola Razr 5G and Vivo-Oppo smartphones)

फ्लिपकार्ट कंपनी सतत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सेल आयोजित करते. अशा परिस्थितीत, आपण स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असल्यास, किंवा अशा सेलच्या प्रतीक्षेत असाल तर ही संधी चुकवू नका. ई-कॉमर्स साईटने बजाज फिनसर्व्ह सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे युजर्सना नो कॉस्ट ईएमआय ची सुविधा मिळेल. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.

अ‍ॅपल आयफोन 11 (Apple Iphone 11)

अ‍ॅपल आयफोन 11 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 48,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलदरम्यान हा फोन नो कॉस्ट ईएमआयच्या मदतीने खरेदी करता येईल. हा फोन दरमहा 7,840 रुपये EMI देऊन खरेदी करता येईल.

मोटो रेझर 5G (Motorola Razr 5G)

मोटोरोला रेझर 5G एक फोल्डेबल फोन आहे, ज्याची मूळ किंमत 1,49,999 रुपये आहे. लाईव्ह सेलमध्ये आपण हा फोन फ्लिपकार्टवरुन 99,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फोनमध्ये फ्लिप डिझाइनसुद्धा आहे. नो कॉस्ट ईएमआयच्या मदतीने आपण दरमहा 16,670 रुपये देऊन फोन खरेदी करू शकता.

LG विंग 128 जीबी (LG Wing 18 GB)

LG Wing मध्ये डुअल OLED swivel डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची मूळ किंमत 80,000 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा स्मार्टफोन 29,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. दरमहा 5000 हजार रुपयांपासूनच्या ईएमआयवर तुम्ही हा फोन घरी घेऊन जाऊ शकता.

ओप्पो रेनो प्रो 5G (Oppo Reno Pro 5G)

ओप्पो रेनो प्रो 5G या स्मार्टफोनमध्ये 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा हँडसेट तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये 39,990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. दरमहा 3000 हजार रुपयांपासूनच्या ईएमआयवर तुम्ही हा फोन घरी घेऊन जाऊ शकता.

शाओमी Mi 10T (Xiaomi Mi 10T)

या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन 144Hz रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. डिस्काऊंटबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही 25,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

इतर बातम्या

Apple चं Xiaomi, OnePlus पावलावर पाऊल, iPhone 13 मध्ये ‘हे’ फीचर्स मिळणार

Partnered : True 48MP Quad Cam, Samsung Galaxy F12 बाजारात, 12 एप्रिलपासून विक्री

(Flipkart Flagship Fest Sale : Big discounts Iphone 11, Motorola Razr 5G and Vivo-Oppo smartphones)