स्वस्तात खरेदी करा Mi, सॅमसंग आणि LG धमाकेदार स्मार्ट TV, वाचा काय आहे किंमत?

फ्लिपकार्टवर बॅनर लाइव्ह झाला आहे, ज्यावर असे लिहिले आहे की, टीव्ही घरी 3,750 रुपयांच्या सूटवर घरी आणता येईल.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:08 PM, 4 Apr 2021
स्वस्तात खरेदी करा Mi, सॅमसंग आणि LG धमाकेदार स्मार्ट TV, वाचा काय आहे किंमत?

मुंबई : फ्लिपकार्ट टीव्ही डेज् (Flipkart TV Days) आजपासून (4 एप्रिल) फ्लिपकार्टवर सुरू झाला आहे. या विक्रीत Mi, सॅमसंग, रिअॅलिटी आणि LG या ब्रँडच्या टीव्हीवर भारी सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टवर बॅनर लाइव्ह झाला आहे, ज्यावर असे लिहिले आहे की, टीव्ही घरी 3,750 रुपयांच्या सूटवर घरी आणता येईल. विक्रीचा शेवटचा दिवस 8 एप्रिल आहे. ग्राहक सेलमध्ये खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय बँक कार्ड वापरत असल्यास त्यांना त्वरित 10% सवलत दिली जाईल. चला जाणून घेऊया कोणत्या टीव्हीवर किती सूट दिली जात आहे. (flipkart tv days on flipkart Start 4 april till 8 april smart tv realme samsung tv lg mi tv offer)

32 इंचाच्या टीव्हीवर सवलत : सेलमध्ये 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही 14,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध केला जात आहे. ही किंमत Mi 4A Pro स्मार्ट टीव्हीची आहे. त्याचबरोबर तुम्हाला सॅमसंगचा 32 इंचाचा HD Ready स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत 16,490 रुपये आहे.

त्याचप्रमाणे LG टीव्ही 16,999 रुपये, Realme टीव्ही 15,499 रुपये आणि Oneplus चा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही 15,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये 40 आणि 43 इंचाच्या स्मार्ट टीव्ही 25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील. 40 इंचाचा Mi 4A Full HD स्मार्ट टीव्ही 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे आणि 43 इंचाचा Realme Full HD स्मार्ट टीव्ही 23,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

त्याचबरोबर, 43 इंचाचा Mi 4A Pro स्मार्ट टीव्ही आणि Vu Premium स्मार्ट टीव्ही 24,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

50 इंचाचा टीव्ही देखील स्वस्त …

जर तुम्हाला 50 इंचाचा टीव्ही खरेदी करायचा असेल तर तो सेलमध्ये 35 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. 50 इंचाचा Mi 4X Ultra HD (4K) स्मार्ट टीव्ही सेलमध्ये 34,999 च्या किंमतीसह देण्यात येत आहे.

दुसरीकडे, 50 इंचाच्या Vu Premium स्मार्ट टीव्हीची किंमत 36,999 रुपये आहे, Nokia Ultra HD स्मार्ट टीव्हीची किंमत 37,999 रुपये आहे. याशिवाय Panasonic Ultra HD स्मार्ट टीव्ही 35,999 रुपये किंमतीत उपलब्ध केला जात आहे. (flipkart tv days on flipkart Start 4 april till 8 april smart tv realme samsung tv lg mi tv offer)

संबंधित बातम्या – 

बोनससह लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, रोज करा फक्त 189 रुपयांची बचत

गंभीर आजारासाठी सरकार देणार 20 लाख रुपये, या योजनेअंतर्गत होणार उपचार

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट! आज 2 तास काम नाही करणार बँकेची ‘ही’ सेवा

(flipkart tv days on flipkart Start 4 april till 8 april smart tv realme samsung tv lg mi tv offer)