AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! जूनमध्ये महागाई घटली, ‘या’ गोष्टी झाल्या स्वस्त

जून 2025 मध्ये देशातील घाऊक महागाई दर 20 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. स्वयंपाकघरातील वस्तू स्वस्त झाल्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे.

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! जूनमध्ये महागाई घटली, 'या' गोष्टी झाल्या स्वस्त
Inflation Rate
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 14, 2025 | 4:38 PM
Share

सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. जून 2025 मध्ये देशातील घाऊक महागाई दर 20 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये घाऊक किंमत निर्देशांक (WPI) वर आधारित महागाई दर.013 % होता, जो ऑक्टोबर 2023 नंतरचा सर्वात कमी आहे. याआधी मे महिन्यात हा दर 0.39 % होता.

सोमवारी (14 जुलै) जाहीर झालेल्या आकडेवारीत महागाई घटल्याचे समोर आले आहे. अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमतीत घट झाल्यामुळे महागाई दर आटोक्यात आला असल्याचे समोर आले आहे. जूनमध्ये भाज्यांचा महागाई दर 22.65 % होता, जो मे महिन्यात असलेल्या 21.62 % होता. कांद्याच्या महागाईचा दर मे महिन्यात 33.49% होता, जो जूनमध्ये 14.41 % पर्यंत खाली आला. जून महिन्यात बटाट्याच्या किमतीत 32.67 % ची घसरण झाली आहे. डाळींच्या किमती 22.65 % ने घसरल्या आहेत. स्वयंपाकघरातील वस्तू स्वस्त झाल्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे.

इंधनाच्या किमतीतही घट

देशातील इंधन आणि विजेच्या किमतीत घट झाली आहे, यामुळे महागाई कमी झाली. जूनमध्ये ही इंधन आणि विजेचा महागाई दर 2.65 % होता, जो मे महिन्यात 22.27 % होता. याचाच अर्थ इंधन आणि विजेच्या किमतीत मोठी घट झाली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

किरकोळ महागाई दरात घसरण

घाऊक महागाई दरासह किरकोळ महागाई दरातही घट झाली आहे. मे 2025 मध्ये हा 2.82 % या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. फेब्रुवारी 2019 नंतरचा हा सर्वात कमी किरकोळ महागाई दर आहे.

आरबीआयने काय म्हटले?

रिझर्व्ह बँकेच्या बैठकीतून, अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी होत आहे अशी माहिती समोर आली होती. आरबीआयने आर्थिक वर्ष 2026 साठी महागाई दर 4.2 % वरून 4 % पर्यंत कमी केला आहे. हा दर पहिल्या तिमाहीत 3.6%, दुसऱ्या तिमाहीत 3.9%, तिसऱ्या तिमाहीत 3.8% आणि शेवटच्या तिमाहीत 4.4% राहण्याची शक्यता आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!