AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौरभ गांगुली नव्या भूमिकेत, बनणार बिझनेसचा ‘दादा’, 350 एकरमध्ये 2500 कोटींचा प्रकल्प

Former Indian Cricket Captain Sourav Ganguly: क्रिकेटनंतर आता गांगुली बिझनेसच्या जगात मजबूत खेळी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची नेटवर्थ जवळपास 700 कोटी आहे. प्यूमा, DTDC, जेएसडब्लू सिमेंट, अजंता शूज आणि माय 11 सर्किल यासारख्या कंपन्यांसोबत त्याची पार्टनरशिप आहे.

सौरभ गांगुली नव्या भूमिकेत, बनणार बिझनेसचा 'दादा', 350 एकरमध्ये 2500 कोटींचा प्रकल्प
Sourav Ganguly
| Updated on: Mar 15, 2025 | 2:02 PM
Share

Sourav Ganguly Business: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अन् भारतीय क्रिकेटचा ‘दादा’ म्हणजे सौरव गांगुली नवीन भूमिकेत येत आहे. स्पोर्टसचे जग सोडून गांगुली आता बिझनेसच्या जगात पदार्पण करत आहे. सौरव गांगुली पश्चिम बंगालमधील गरबेटामध्ये स्टील प्लॅट उभारत आहे. गांगुलीने ग्रीनफील्ड स्टील प्रोजेक्टसाठी टीएमटी बार निर्माता कॅप्टन स्टीलसोबत प्रकल्प उभारत आहे. कॅप्‍टन स्‍टीलजवळ दुर्गापूर आणि पटणा येथे दोन स्टील फॅक्टरी आहेत. या प्रकल्पात गांगुलीचा किती टक्के वाटा आहे, त्याची माहिती जाहीर झालेली नाही.

18 ते 20 महिन्यांत प्रकल्प सुरु होणार

गांगुलीचा स्टील प्लँट पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील गरबेटा येथे उभारण्यात येत आहे. त्याची वार्षिक क्षमता 0.8 मिलियन टन असणार आहे. आधी हा प्रकल्प सालबोनीमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु त्यानंतर गरबेटा येथे उभारण्याचा निर्णय घेतला. 2500 कोटींची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात सौरव गांगुल याने नुकतीच माहिती दिली होती. तो म्हणालो, आम्ही स्टील प्लँट उभारत आहोत. हा प्रकल्प दोन महिन्यांत पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. परंतु ते शक्य नाही. 18 ते 20 महिन्यांत हा प्रकल्प सुरु होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

सौरव गांगुली म्हणाला, आमचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पात पर्यावरणाची मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, पायाभूत निर्मिती यासाठी वेळ लागणार आहे. या प्रकल्पासाठी 350 एकर जमिनीची गरज आहे, त्याचे अधिग्रहण केले जात आहे.

क्रिकेटनंतर आता गांगुली बिझनेसच्या जगात मजबूत खेळी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची नेटवर्थ जवळपास 700 कोटी आहे. प्यूमा, DTDC, जेएसडब्लू सिमेंट, अजंता शूज आणि माय 11 सर्किल यासारख्या कंपन्यांसोबत त्याची पार्टनरशिप आहे. त्या माध्यमातून त्याची कोट्यवधींची कमाई दरवर्षी होते.

सौरव गांगुली केवळ स्टील उद्योगातच नाही तर रिअल इस्टेटमध्येही चमकदार फलंदाजी करत आहे. त्यांचा कोलकात्यात सात कोटींहून अधिक किमतीचा आलिशान बंगला आहे. लंडनमध्ये दोन बीएचके फ्लॅटही आहे. गांगुलीने ज्या प्रकारे भारतीय संघाला क्रिकेटमध्ये नव्या उंचीवर नेले, तसे उद्योगातही नेणार का? हे येत्या काही दिवसांत दिसेल.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.