
देशाची सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता.त्यानंतर एल अॅण्ड टीचे एस.एन.सुब्रह्मण्यम यांनी ९० तास काम करण्याचा सल्ला तरुणांना दिला. यावर देशभरात नवीन चर्चा सुरु झाली असतानाच आता नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी या वादात उडी मारत आता तुरुणांना ८० ते ९० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांचे नाव न घेता माणसा ऐवजी ते रोबोटबद्दल तर बोलत नाहीत ना ?
एकीकडे राजकीय आणि कॉर्पोरेट जगताकडून आपल्या देशाची जर चीनप्रमाणे प्रगती करायची असेल तर तरुणांनी अधिक तास काम करावे असे म्हटले जात आहे.एकीकडे आठवड्याच्या कामाचे दिवस कमी करण्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे अशी देखील चर्चा सुरु आहे. आठवड्यातून पाच दिवस काम करणारे दर दिवशी ९ तासांच्या हिशेबाने ४५ तास काम करतात. केवळ एक दिवसाचा विकली ऑफ घेणारे रोज आठ तासांच्या हिशेबाने ४८ तास काम करतात. याला बॅलन्स करण्यासाठी ९ तासांच्या शिफ्टमध्ये बहुतांश ठिकाणी तासाभराचा एकदा किंवा अर्ध्या तासांचे दोन ब्रेक दिले जातात. तर ४८ तास काम करणाऱ्या एक ब्रेक अर्ध्या तासांचा रोज मिळत असतो. या प्रकारे ४४ किंवा ४५ तासांचे काम बहुतांशी नोकरीपेशा करणारे करीत असतात.
आठवड्यात ९० तासांचे काम करण्याचा सल्ला देणाऱ्यांना एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, जरी ९० तासांच्या कामासाठी जरी रोज १२ तास काम केले तरी आठवड्यात केवळ ८४ तासच असतात. उरलेले सहा तास पूर्ण करण्यासाठी सहा दिवसांपर्यंत कोणाला १३ ता, काम करावे लागेल. म्हणजे हे टार्गेट अचीव करण्यासाठी सहा दिवसापर्यंत कोणाला १३ तास आणि रविवारी एक तासांची सुट्टी घेत १२ तास काम करावे लागेल. ९० तासांच्या कामाचा सल्ला तरुणांना दिला जात आहे. जर तरुणांनी मेहनतीने इतके तास काम केले तर मग ते आपल्या आई-वडीलांना , मुलांना वेळ कधी देणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नोकरपेशा वर्ग कामाच्या जवळ राहत नाही. त्यांना दूरवरुन प्रवास करुन नोकरीचे ठिकाण गाठावे लागत असते. म्हणजे त्यांचा प्रवासात जर दोन तासांचा वेळ जात असेल तर कामाचे तास १५ होतात. २४ तासातील १५ तास जर घराबाहेर राहीले तर ९ तासच उरतील. तेव्हा या नऊ तासांत तो केव्हा संसार उपयोगी वस्तू आणणार आणि इतर कामे करणार ? या तासांत त्याला त्याचे दैनंदिन व्यवहार देखील करायचे आहेत. त्यामुळे अशा ९० तासांचे काम करण्याचा सल्ला देणाऱ्यांविरोधात रोष निर्माण झाला आहे.