Share : अदानींच्या एका खेळीने हा स्टॉक झाला शेअरसिंग! 5 दिवसांपासून बाजारात लावले अप्पर सर्किट

| Updated on: Nov 15, 2022 | 7:15 PM

Share : परीसाचा हात लागला की लोखंड ही सोनं होतं ना! मार्केटमध्ये असाच काहीसा प्रकार सुरु आहे..

Share : अदानींच्या एका खेळीने हा स्टॉक झाला शेअरसिंग! 5 दिवसांपासून बाजारात लावले अप्पर सर्किट
बाजारात शेअरसिंग
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : जगातील तिसरी श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांची एंट्री होताच एका कंपनीच्या स्टॉकने (Stock) गगन भरारी घेतली आहे. हा शेअर रॉकेटच्या गतीने धावत आहे. या स्पर्धेत अदानीच एकटे नाही, तर आशियातील आणखी एक श्रीमंत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचाही समावेश आहे. एकूण 15 दिग्गज ग्रुप ही कंपनी पदरात पाडून घेण्यासाठी, खरेदीसाठी स्पर्धेत आहेत.

तर बिग बाजार हे नाव तुम्ही ऐकले नाही, असं तर होणार नाही, भारतात मॉल संस्कृतीत रुजवायला या ब्रँडने फारमोठा हातभार लावला आहे. या कंपनीची मूळ कंपनी Future Retail हिच्या अधिग्रहणासाठी अनेक दिग्गज कंपन्या बाजारात उतरल्या आहेत.

फ्यूचर रिटेल खरेदीसाठी अगोदर केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच स्पर्धेत होती. पण आता सामना रंगला आहे. कारण या स्पर्धेत गौतम अदानी यांनीही एंट्री घेतली आहे. त्यामुळे शेअर बाजारात या शेअरने उत्तुंग झेप घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

तर फ्यूचर रिटेल ग्रुप सध्या दिवाळीखोरीत गेला आहे. या कंपनीवर अनेक मोठ-मोठ्या देणेकऱ्यांचं कर्ज आहे. ते फेडण्यासाठी या ग्रुपला मोठी रक्कम हवी आहे. त्यासाठी ही कंपनीच विक्रीला काढण्यात आली आहे.

ही कंपनी खरेदी करण्यासाठी जगातील अनेक कंपन्या उत्सुक आहेत. त्यात अदानी आणि अंबानी यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या दोघांसोबतच एप्रिल मून रिटेल प्रायव्हेट हा जागतिक ब्रँड आणि इतर 13 कंपन्याही स्पर्धेत आहेत.

गौतम अदानी यांच्या या खरेदी प्रक्रियेतील प्रवेशापासून स्टॉक बाजारात हा शेअर एकदम तेजीत आला आहे. Future Retail च्या शेअरला सातत्याने अप्पर सर्किट लागले आहे. सोमवारपासून तर या शेअरने आतापर्यंतची सगळी मरगळ झटकली आहे.

या शेअरमध्ये 4.29 टक्क्यांची वृद्धी दिसून आली आहे. सध्या अनेक दिवसांपासून मार्केटमध्ये थंडावलेला हा शेअर झटक्यात वधरला आहे. सध्या हा शेअर 3.65 रुपयांवर व्यापार करत आहे. पण हा शेअर बाजारातून डी-लिस्टेडची प्रक्रिया सुरु आहे.

आजही सुपर मार्केटचं नाव घेतलं की अगोदर बिग बाजारचंच नाव येतं. सुरुवातीला भारतीयांच्या हे नाव अत्यंत अंगवळणी पडलेले आहे. बिग बाजारची मूळ कंपनी फ्यूचर रिटेल कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे.

फ्यूचर रिटेलवरील कर्जाचा डोंगर पाहता, ही कंपनी पुन्हा उसळी घेण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आता ही कंपनी विक्रीला काढण्यात आली आहे. सध्या या कंपनीवर देणेकऱ्यांचं 21,000 कोटींपेक्षा अधिकचं कर्ज आहे.