AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2026 सुरु होताच शेअर बाजारात दिवाळी, ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ… निफ्टी आणि सेन्सेक्सचे ‘अच्छे दिन’

Gainer on Budget Day: बजेट सुरु होताच शेअर बाजारात अचानक झालेल्या तेजीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधलं आहे. काही ठराविक स्टॉक्समध्ये लभणीय वाढ दिसून आली आहे. जर आपण व्हॉल्यूम आणि किमतीच्या हालचाली पाहिल्या तर, बाजार आगामी हालचालींसाठी महत्त्वाचे संकेत देत आहे.

Budget 2026 सुरु होताच शेअर बाजारात दिवाळी, 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ... निफ्टी आणि सेन्सेक्सचे 'अच्छे दिन'
Budget 2026
| Updated on: Feb 01, 2026 | 12:27 PM
Share

Gainer on Budget Day: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला शेअर बाजार मोठ्या हालचाली दिसून आल्या. बजेटची सुरुवात झाल्यानंतर काही शेअर्समध्ये अचानक लक्षणीय वाढ झाली आहे. बजेट सादर होत असताना निफ्टी आणि सेन्सेक्सचे ‘अच्छे दिन’ दिसून आले. दरम्यान, निवडक शेअर्समध्ये 10% किंवा त्याहून अधिक तेजी दिसून आली. अशा प्रकारची तेजी सामान्यतः तेव्हा दिसून येते जेव्हा स्मार्ट मनी एखाद्या विशिष्ट थीम किंवा क्षेत्रात वेगाने स्थान निर्माण करतं.

Zelio E Mobility आणि Garware Marine Industries च्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ…

बजेट सादर होत असताना Zelio E Mobility सर्वाधिक चर्चेत आली. Zelio E Mobility च्या शेअर्समध्ये झटक्याट 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा शेअर 268 रुपयांवर ट्रेड करताना दिसत आहे. Zelio E Mobility ही कंपनी इलेक्ट्रीक व्हीकल आणि ई – मोबिलिटी संबंधित आहे. अर्थसंकल्पात हरित ऊर्जा, ईव्ही पायाभूत सुविधा आणि स्वच्छ वाहतुकीबाबत काही प्रकारचे प्रोत्साहनाची अपेक्षा या स्टॉकच्या वाढीचं कारण असल्याचं मानलं जात आहे. ई – मोबिलिटी सेक्टर पूर्वीपासून गुंतवणुकदारांच्या रडारवर आहे. बजेटच्या दिवाशी झालेली वाढ विश्वास दर्शवते.

याच प्रमाणे शिपबिल्डिंगमध्ये सक्रिय असलेली कंपनी Garware Marine Industries च्या शेअर्समध्ये देखील 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बजेट सादर होताच, या शेअरने 27 रुपयांचा उच्चांक गाठला. कंपनी सागरी आणि मासेमारीशी संबंधित उत्पादने बनवते. पायाभूत सुविधा, बंदरे, शिपिंग आणि ब्लू इकॉनॉमी क्षेत्रावर बजेटमध्ये लक्ष केंद्रित करण्याच्या अपेक्षांमुळे शेअरमध्ये खरेदी वाढली.

एयरोस्पेस आणि डिफेंस सेक्टरशी संबंधित असलेल्या High Energy Batteries ने देखील गुंतवणुकदारांना चकित रेलं आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये 10.10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर 10.10 टक्क्यांनी वाढून 619 रुपयांवर ट्रेड करत आहेत. संरक्षण उत्पादन, स्वदेशीकरण आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये सरकारी खर्च वाढण्याची अपेक्षा असल्याने या क्षेत्रात आधीच सकारात्मक चित्र दिसत आहे.

Follow Us
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर