AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, इतकी वाढली संपत्ती

Gautam adani vs mukesh ambani : गौतम अदांनी यांनी संपत्तीच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे. नवीन वर्षाची सुरुवात अदानी यांच्यासाठी सकारात्मक ठरली आहे. कारण मुकेश अंबानी यांनी मागे टाकत गौतम अदानी भारतातील नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते बाराव्या स्थानावर पोहोचले आहेत.

मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, इतकी वाढली संपत्ती
ambani vs adani
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 05, 2024 | 1:38 PM
Share

Gautam Adani : भारतातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना उद्योगपती गौतम अदानी यांनी मागे टाकले आहे. गौतम अदानी आता भारतालेच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गौतम अदानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. ते जगात आता 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याच्या संपत्तीत २४ तासांत ७.६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 12 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर घसरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानींची संपत्ती (mukesh ambani net worth) 97 अब्ज डॉलर्स आहे. गेल्या 24 तासांत त्याची एकूण संपत्ती $665 दशलक्षने वाढली आहे.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती किती?

अदानी समूहाचे मालक आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तर आहेतच पण जगात अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आले आहेत. गुरुवारपर्यंत ते या यादीत 14 व्या क्रमांकावर होते, मात्र 24 तासांत त्याने केलेल्या प्रचंड कमाईमुळे त्याच्या नेट वर्थमध्ये चांगली वाढ झाली आणि ते 14 व्या स्थानावरून 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $97.6 अब्ज झाली आहे.

गौतम अदानी यांची संपत्तीत मोठी वाढ?

गौतम अदानी यांना हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे कंपनीचे मूल्य वाढत आहे. त्यामुळेच गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. याप्रकरणी सेबीचा तपास योग्य मार्गावर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. बाजार नियामक सेबीला 24 पैकी उर्वरित 2 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ

गेल्या दोन दिवसांच्या वाढीसोबतच शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्येही जोरदार वाढ दिसून आली. BSE वर ACC सिमेंटचे शेअर्स 3.20% वाढून 2,352 रुपये प्रति शेअर झाले. यासह अदानी पोर्ट सुमारे 3 टक्के, अदानी पॉवर 2 टक्के, अदानी टोटल गॅस 2 टक्के, अदानी विल्मर शेअर 0.12 टक्के, अंबुजा सुमारे 3 टक्क्यांनी वाढले. तर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 0.18 टक्क्यांनी घसरले. याशिवाय अदानी एनर्जी सोल्युशन्स 0.41% आणि अदानी एनर्जी 0.43 टक्क्यांनी घसरले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना