AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Reliance Share : 786 रुपयांचा शेअर अवघ्या 1 रुपयात! कोणाचे नशीब चमकणार, मुकेश अंबानी मालामाल करणार

Reliance Share : रिलायन्स कम्युनिकेशनच्या शेअरने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. मुकेश अंबानी यांनी आता त्यासाठी खास प्लॅन आखला आहे. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होऊ शकतो.

Reliance Share : 786 रुपयांचा शेअर अवघ्या 1 रुपयात! कोणाचे नशीब चमकणार, मुकेश अंबानी मालामाल करणार
| Updated on: Apr 11, 2023 | 12:11 PM
Share

नवी दिल्ली : अनिल अंबानी (Anil Ambani) यांची दिवाळखोरीत निघालेली कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचा शेअर (Reliance Communications share) पुन्हा एकदा तेजीत आला आहे. गेल्या आठवड्यात या शेअरने बीएसईवर 5 टक्क्यांची उसळी घेतली. अप्पर सर्किटसह हा शेअर 1.47 रुपयांवर बंद झाला. या शेअरने गेल्या 52 आठवड्यात उच्चांकी 3.19 रुपयांची झेप घेतली तर हा शेअर 1.17 रुपयांपर्यंत घसरला. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 406 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या काही मालमत्तेसंबंधी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) खास प्लॅन आखत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो.

काय घडामोड अनिल अंबानी यांची ही कंपनी कधीच दिवाळखोरीत निघाली आहे. त्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीज, रिलायन्स इंफ्राटेलचे (Reliance Infratel) मोबाईल टॉवर आणि फायबर ॲस्टेस खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी मुकेश अंबानी यांच्या कंपनीने एसबीआयच्या एस्क्रो खात्यात 3720 कोटी रुपये जमा केले आहे. त्यामुळेच या शेअरमध्ये जोरदार रॅली दिसून येत आहे. या शेअरमध्ये तेजीचे सत्र आले आहे. रिलायन्स इन्फ्राटेल, रिलायन्स कम्युनिकेशन्सची उपकंपनी आहे.

कधी होता 786 रुपयांचा भाव अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचा शेअर वर्ष 2007 मध्ये 786 रुपयांपर्यंत वाढला होता. त्यानंतर हा शेअर जोरदार आपटला. या शेअरमध्ये अनेक चढउतार आले. हा शेअर 1 रुपयांच्या घरात आला. गुंतवणूकदारांचे दिवाळे निघाले. यावर्षी या शेअरमध्ये जवळपास 25 टक्के घसरण झाले. गेल्या एका वर्षात हा शेअर जवळपास 50 टक्क्यांनी घसरला. परंतु, सध्या या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.

दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु अनिल अंबानी यांची कंपनी आरकॉम यावेळी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. कधीकाळी टेलिकॉम सेक्टरमध्ये या कंपनीचा बोलबाला होता. रिलायन्स जिओच्या पदार्पणानंतर ही कंपनी प्राईस वॉरची शिकार झाली. ही कंपनी मोठ्या कर्जाच्या फेऱ्यात अडकली. 2016 मध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओची सुरुवात केली. या कंपनीने फ्री डेटाची ऑफर देऊन बाजारात खळबळ माजवली होती.

कसा झाला शेअरचा प्रवास आरकॉमचे शेअर (RCom Share) जून 2006 पासून सातत्याने वाढत आहेत. त्यावेळी हा शेअर 225 रुपये होता. डिसेंबर 2006 मध्ये तो 471 रुपयांवर पोहचला. ऑक्टोबर 2007 मध्ये हा शेअर 786 रुपयांवर पोहचला. हा शेअर प्रचंड घसरला. फेब्रुवारी 2009 मध्ये शेअरची किंमत 160 रुपयांवर आली. मे 2009 मध्ये हा शेअर 306 रुपयांवर पोहचला. एप्रिल 2019 मध्ये शेअरची किंमत 2 रुपये झाली होती.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.