AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दिवाळीमध्ये खास आपल्या प्रियजनांना गिफ्ट करा ‘हा’ म्युच्युअल फंड, FD पेक्षा जास्त परतावा मिळेल!

दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीला आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटवस्तू पाठवतो. यामध्ये मिठाई, कपडे इ. मात्र, यासोबत तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुमच्या मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावाने भेटवस्तूही देऊ शकता.

या दिवाळीमध्ये खास आपल्या प्रियजनांना गिफ्ट करा 'हा' म्युच्युअल फंड, FD पेक्षा जास्त परतावा मिळेल!
म्युच्युअल फंड
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 9:38 AM
Share

मुंबई : दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीला आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटवस्तू पाठवतो. यामध्ये मिठाई, कपडे इ. मात्र, यासोबत तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुमच्या मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावाने भेटवस्तूही देऊ शकता. असाच एक खास फंड म्हणजे Mirae Asset Emerging Bluechip Fund. आहे.

गेल्या वर्षी 70% परतावा रिटर्न

या फंडने गेल्या वर्षभरात 70 टक्के परतावा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा परतावा खूप चांगला आहे. समजा, तुम्ही या फंडात एक लाख रुपये गुंतवले आहेत. तर, पुढच्या तीन वर्षांत ते वाढून 2.26 लाख रुपये होतील. याशिवाय, जर तुम्ही दरमहा 10,000 रुपयांची एसआयपी केली असती, तर गेल्या तीन वर्षांत तुमचे पैसे 6.21 लाख रुपये झाले असते. हा फंड 1 जानेवारी 2013 रोजी लॉन्च करण्यात आला आहे. लॉन्च झाल्यापासून फंडाने 26.15 टक्के परतावा दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते, तुमचे पैसे 2.7 वर्षांत गुंतवल्याने दुप्पट झाले. हे FD पेक्षाही जास्त आहेत. फिक्स्ड डिपॉजिटच्या तुलनेत निम्म्याहून कमी वेळेत पैसे दुप्पट होतील. त्या तुलनेत सध्या एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे 10 वर्षांत दुप्पट होतात. FD वरील गुंतवणुकीवरही कर लागतो. पण या फंडात पैसे गुंतवल्यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.

21,200 कोटी रुपयांची मालमत्ता

फक्त रु. 109 प्रति युनिटमध्ये खरेदी करून तुम्हाला उत्तम परतावा मिळतो. 7 वर्षे, 5 वर्षे आणि 3 वर्षांच्या श्रेणीमध्ये हा फंड इतरांपेक्षा चांगला परतावा देतो आणि पहिल्या क्रमांकावर आहे. हे एक अतिशय लोकप्रिय फंड आहे. यामध्ये अनेक गुंतवणूकदारांनी पैसा लावला आहे. त्याची मालमत्ता 21,200 कोटी रुपये आहे. हा मोठा फंड आहे.

या फंडाच्या टॉप होल्डिंग्समध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, व्होल्टास, जेके सिमेंट, गुजरात स्टेट पॅट्रोनेट यांचा समावेश आहे. म्हणजेच या फंडाच्या टॉप होल्डिंगमध्ये समाविष्ट असलेली सर्व नावे मोठी आहेत.

संबंधित बातम्या : 

नव्या वर्षात Amul ची फ्रँचायझी घ्या, बिझनेस सुरु करा, 2 लाखांच्या गुंतवणुकीवर 10 लाखापर्यंत कमवा

Gold Price Today | डॉलरमध्ये घसरण सोन्याला झळाळी, सोने 50 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, जाणून घ्या नवे दर

मे महिन्यासाठी छोटू LPG सिलिंडरची किंमत जारी, कागदपत्रांचं नो टेन्शन, 2 तासांत मिळणार घरपोच

(Gift this Mirae Asset Emerging Bluechip Fund to your relatives on the occasion of Diwali)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली