
Gold And Silver Price 19 October 2025 : ऐन दिवाळीत सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. धनत्रयोदशीला चांदीत तर मोठी पडझड झाली. दोन्ही धातुच्या किंमती यंदा तुफान आले आहे. सोन्याची दीड लाखांकडे धाव आहे. तर चांदीने दोन लाखांकडे घोडदौड सुरू केली होती. दोन्ही धातुत महागाईचे तुफान आले असले तरी खरेदी थांबलेली नाही. दोन्ही धातुवर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. खरेदी करताना सोने आणि चांदीची शुद्धता तपासा. नाहीतर त्यात फसवणूक होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
सोन्याची किंमत काय?
goodreturns.in नुसार, 24 कॅरेट सोन्यात काल 333 रुपयांची वाढ झाली होती. तर आज सकाळी त्यात घसरण दिसत आहे. 1 ग्रॅम सोने 191 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर 10 ग्रॅम सोने 1910 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 31 हजार 001 रुपये इतका झाला. तर 22 कॅरेट सोने 175 रुपयांनी घसरले. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 20 हजार 100 रुपये असा आहे. काल किंमतीत कोणताही बदल झाला नसल्याचे दिसते.
चांदीत मोठी पडझड
चांदीने या वर्षी इतिहास रचला. एक किलो चांदीचा भाव 1 लाख 85 हजारांच्या घरात पोहचली आहे. गेल्या दोन दिवसात चांदीत 18 हजारांची घसरण आली. 16 ऑक्टोबर रोजी चांदीत 1 हजारांची तर 17 ऑक्टोबर रोजी चांदीत 4 हजारांची घसरण झाली होती. 19 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात चांदीत महा घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,84,900 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने घसरले आणि चांदी वधारले. 19 ऑक्टोबर रोजीच्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोने 1,29,580 रुपये, 23 कॅरेट 1,29,007, 22 कॅरेट सोने 1,18,700 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 97,190 रुपये, 14 कॅरेट सोने 75,810 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,71,275 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्यापेक्षा चांदीला सर्वाधिक मागणी
चांदीने मोठी मुसंडी मारली. चांदीने 2 लाखांकडे झेप घेतली. पण त्यानंतर चांदीत घसरण झाली. चांदी 6 हजारांपेक्षा अधिक घसरली. तरीही चांदीकडे ग्राहकांचा ओढा आहे. चांदीचे शिक्के खरेदीत वार्षिक आधारावर 35 ते 40 टक्के वृद्धी दिसून येत आहे. तर सोन्याच्या दागदागिने खरेदीत जवळपास 15 टक्क्यांची घसरण झाल्याची माहिती अखिल भारतीय रत्न आणि आभूषण घरगुती परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिली.