
Gold and Silver Price Fallen : सोने आणि चांदीच्या भरारीने ग्राहकांना मोठा धक्का बसला होता. सोन्याने 1 लाख 32 हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर दोन लाखांचा टप्पा गाठण्यासाठी चांदीची कसरत सुरु होती. या गगनभरारीने ग्राहकही नाराज झाले होते. पण गेल्या 13 दिवसांत दोन्ही धातुत कमाल घसरण नोंदवण्यात आली. आज सकाळच्या सत्रात गुडरिटर्न्सनुसार, चांदीचा भाव 1 लाख 50 हजार 900 रुपये इतका आहे. तर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 21 हजार 620 रुपये इतका आहे. गेल्या 13 दिवसांत चांदीत 25 हजारांहून अधिक तर सोन्यात 10,246 रुपयांची घसरण झाली.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदी घसरली. 31 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,19,620 रुपये, 23 कॅरेट 1,19,140, 22 कॅरेट सोने 1,09,570 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 89,710 रुपये, 14 कॅरेट सोने 69,980 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,45,600 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याच्या किंमतीत का आली घसरण?
धनत्रयोदशी, दिवाळी सारख्या सणासुदीला सोने आणि चांदीची मागणी घटली. खरेदीदारांनी पाठ फिरवल्याने त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतीवर दिसला. नफेखोरीमुळे विक्री वाढल्याचा परिणामही दिसून आला. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) सारख्या टेक्निकल इंडिकेटर्सनुसार, किंमती ओव्हरबॉट झोनमध्ये पोहचल्या. त्यामुळे ट्रेंड फॉलोअर्स आणि डीलर्सने मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची विक्री करून पैसा कमावला. परिणामी दोन्ही धातुच्या किंमतीत घसरण आली. भूराजकीय घडामोडी नरमल्या. रशिया-युक्रेनचे युद्ध सोडता जगात तशी शांतता म्हणावी लागेल. त्याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येते. आर्थिक संकटात सोन्याचे मूल्य वाढते. तर हे संकट निवळातच सोन्याचे मूल्य वाढते.
यंदा किती वाढल्या किंमती?
यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 43,091 रुपयांची उसळी दिसली. 31 डिसेंबर 2024 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,162 रुपये इतकी होती. आता ही किंमत 1,19,253 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत उतरली आहे. तर चांदीच्या किंमतीत 59,583 रुपयांची वाढ दिसली. 31 डिसेंबर 2024 रोजी एक किलोग्रॅम चांदीची कीमत 86,017 रुपये इतकी होती. आता ही किंमत 1,45,600 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी आहे. गेल्या 13 दिवसांत चांदीत 25 हजारांहून अधिक तर सोन्यात 10,246 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांना सुखद धक्का बसला आहे.