Gold And Silver Price : सोने-चांदीची तुफान घोडदौड; किंमतीत रेकॉर्डमागून रेकॉर्ड, आता भाव काय?

Jalgaon Gold And Silver Price : जळगाव सराफा बाजाराने ग्राहकांना घाम फोडला आहे. पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच सोने आणि चांदीत तुफान उसळी आली आहे. त्यामुळे नवरात्र,दसरा आणि दिवाळीत सोनं आणि चांदी मोठा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Gold And Silver Price : सोने-चांदीची तुफान घोडदौड; किंमतीत रेकॉर्डमागून रेकॉर्ड, आता भाव काय?
सोने-चांदीचा तुफान राडा
| Updated on: Sep 10, 2025 | 9:04 AM

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात झळाळी पाहायला मिळत आहे. दररोज सोन्याचा दर नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. सोन्याच्या दरात 9 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,08,490 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 99,450 रुपये झाला आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 81,370 रुपये आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रति ग्रॅम 128 रुपये असून, प्रति किलोग्रॅमसाठी 1,28,000 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत 2.5% ची मोठी वाढ झाली आहे. या वाढीमागचं मुख्य कारण अमेरिकेतील कमजोर रोजगार आकडेवारी आहे. फेडरल रिझर्व्ह या वर्षी तीन वेळा व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा वाढली आहे. आता बाजार पुढील आठवड्यात होणाऱ्या फेडच्या बैठकीत 0.25% कपातीची शक्यता लक्षात घेऊन उत्सुक आहे.

सोन्यात आले तुफान

गेल्या आठवड्यात सोन्याने 2100 रुपयांहून अधिकची उसळी घेतली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सकाळच्या सत्रात सोने उतरलेले दिसले. पण दुपारनंतर किंमतीत मोठी वाढ झाली. गुडरिटर्न्सने अपडेट केलेल्या किंमतीनुसार, 8 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव 460 रुपयांनी तर 9 सप्टेंबर रोजी 136 रुपयांनी आणि आणि आज सकाळच्या सत्रात ही सोने वधारलेले दिसले. . गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,10,450 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,01,260 रुपये इतका आहे.

चांदी चमकली

4 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या सुधारणा जाहीर झाल्या. त्यानंतर चांदीत पडझड दिसून आली. 8 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयांनी उतरली. तर 9 सप्टेंबर रोजी चांदीने 3 हजारांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात चांदीने झेप घेतली आहे. एक किलो चांदीचा भाव 1,30,100 रुपयांवर आला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव वधारला आहे.. 24 कॅरेट सोने 1,09,480 रुपये, 23 कॅरेट 1,09,040, 22 कॅरेट सोने 1,00,280 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 82,110 रुपये, 14 कॅरेट सोने 64,040 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,24,770 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.