Gold Price Today : सोने इतके झाले स्वस्त; टॅरिफ घडामोडींपूर्वीच उतरल्या किंमती, 10 ग्रॅमचा भाव काय? चांदीची किंमत जाणून घ्या

Gold And Silver Price Today : अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीची आज बैठक होत आहे. यामध्ये अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे टॅरिफबाबत ही मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीवर होण्याची शक्यता आहे.

Gold Price Today : सोने इतके झाले स्वस्त; टॅरिफ घडामोडींपूर्वीच उतरल्या किंमती, 10 ग्रॅमचा भाव काय? चांदीची किंमत जाणून घ्या
सोने आणि चांदीचा भाव काय
| Updated on: Sep 17, 2025 | 1:37 PM

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीची आज बैठक होत आहे. त्यापूर्वी बुधवारी भारतीय सराफा आणि वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती दबावाखाली दिसून आल्या. फेडच्या बैठकीत अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. तर 50 टक्के टॅरिफबाबत ही मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीवर होण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजता वायदे बाजारात (MCX) सोने (ऑक्टोबर वायदा 1,09,705 प्रती 10 ग्रॅमवर व्यापार करत होता. यामध्ये 0.41% घसरण दिसून आली. तर चांदी (डिसेंबर वायदा)1,27,304 प्रती किलोवर होती यामध्ये 1.18% घसरण दिसून आले.

डॉलर मजबूत, फेडचा निर्णय काय?

लाईव्हमिंटच्या वृत्तानुसार, सोन्याच्या किंमती दबावाखाली आहे. डॉलर इंडेक्समध्ये 0.10% हून अधिकची तेजी आहे. डॉलर मजबूत झाल्यावर इतर चलनातून सोने खरेदी महागते. त्यामुळे सोन्याची मागणी घटते. आज फेड 25 बेसिस पॉईंट्स व्याजदर कपातीची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, या संपूर्ण कालावधीत 75-100 बेसिस पॉईंटसची कपात होऊ शकते. असे जर झाले तर सोन्याची मागणी वाढू शकते. किंमती कमी झाली तर ग्राहकांच्या खरेदीसाठी उड्या पडतील.

सोन्याची किंमत किती?

goodreturns.in नुसार, 16 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 87 रुपयांनी वधारले होते. तर आज त्यात 22 रुपयांची घसरण आली. आता सोन्याचा भाव 11,186 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10,255 रुपये आहे. काल हाच भाव 80 रुपयांनी वधारून 10,275 रुपये इतका होता.

चांदीत 2 हजारांची घसरण

गेल्या आठवड्याच्या अखेरीस चांदीने 3 हजारांची उसळी घेतली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 15 सप्टेंबर रोजी चांदीत कोणताही मोठा बदल दिसला नाही. 16 सप्टेंबर रोजी एक हजारांची दरवाढ झाली होती. तर आज सकाळच्या सत्रात किंमतीत घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,32,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे. 24 कॅरेट सोने 1,09,970 रुपये, 23 कॅरेट 1,09,530, 22 कॅरेट सोने 1,00,730 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 82,480 रुपये, 14 कॅरेट सोने 64,330 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,29,300 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.