
सुवर्ण नगरी असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी प्रत्येकी 1 हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचे प्रती तोळा भाव शुक्रवारी 72 हजार 100 रुपये तर चांदीचे प्रती किलोचे भाव 91 हजारांवरून 90 हजार रुपयांवर खाली आले. सोने-चांदीचे दर दिवाळीत उच्चांकी पातळीवर पोहोचतील असा अंदाज असताना शुक्रवारी सोने-चांदीच्या दरात प्रत्येकी एक हजार रुपयांनी घसरण झाली. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सटोडियांची नफेखोरी कारणीभूत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करून परिणाम घडवणारे नफेखोरांमुळे सोने चांदीच्या दराच्या चढउतार होत असल्याचं सराफ व्यावसायिक यांच म्हणणं आहे.
सोने-चांदीचे दर दिवाळीत उच्चांकी पातळीवर पोहोचतील असा अंदाज जाणकारांनी वर्तवला होता. मात्र असे असतानाच शुक्रवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात प्रत्येकी एक हजार रुपयांनी घसरण झाली. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सटोडियांची नफेखोरी कारणीभूत आहे. दरम्यान दिवाळीपर्यंत सोने व चांदीच्या दरात अशीच चढउतार होत राहील, असे सोने-चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या अभ्यासकांचा अंदाज आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी खबरदारी घेऊन गरज असेल तेव्हाच खरेदी करावी, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे. सोन्याचे गुरूवारी प्रती तोळा ७३१०० रुपये असलेले दर शुक्रवारी 72100 तर चांदीचे प्रति किलोचे दर 91 हजारांवरून 90 हजारांवर खाली आले होते. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करून परिणाम घडवणारे नफेखोर आहे असे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन दिवसांत सोन्याने जोरदार भरारी घेतली. त्यामुळे या महिन्यात सोने आता दमदार कामगिरी दाखवेल असे वाटत होते. पण एकाच दिवसात त्यात मोठी घसरण आली. 21 जूनला सोन्याने 810 रुपयांची उसळी घेतली. तर 22 जून रोजी किंमती 870 रुपयांनी उतरल्या होत्या. गुडरिटर्न्सनुसार, 23 जून रोजी 22 कॅरेट सोनं 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,530 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,750 रुपये, 22 कॅरेट सोने 66,640 रुपये इतकी झाली. 18 कॅरेट 54,560 रुपये, 14 कॅरेट सोने 42,556 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.