Gold And Silver Rate Today : चार दिवसात सोन्याची खतरनाक चाल; चांदीतही तुफान, भाव ऐकूण पावसाळ्यात ग्राहकांना फुटला घाम

Gold And Silver Rate Today : सोने आणि चांदीने गेल्या चार दिवसांत जोरदार मुसंडी मारली. दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता काय आहेत या बेशकिंमती धातुंचा भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

Gold And Silver Rate Today : चार दिवसात सोन्याची खतरनाक चाल; चांदीतही तुफान, भाव ऐकूण पावसाळ्यात ग्राहकांना फुटला घाम
| Updated on: Sep 04, 2025 | 10:12 AM

सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 1 सप्टेंबरपासून दोन्ही धातुंनी जोरदार मुसंडी मारली आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने ऐन सणासुदीत किंमती वाढण्याची भीती ग्राहकांना वाटत आहे. सोन्यापाठोपाठ चांदीतही तुफान आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जीएसटी रिफॉर्मचा सोने आणि चांदीच्या किंमतींवर काही परिणाम होतो का, याकडे तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. काय आहेत आता या मौल्यवान धातुची किंमत, जाणून घ्या एका क्लिकवर….

सोन्याला आली चमक

सोन्याचा भाव गेल्या चार दिवसात वाढला आहे. सोने या काळात 2000 रुपयांहून अधिकने वाढले आहे. गुडरिटर्न्सनुसार, 1 सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव 930 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला. 2 ,सप्टेंबर रोजी हा भाव 210 रुपयांनी 3 सप्टेंबर रोजी 880 रुपयांनी तर आज सकाळी यामध्ये वाढ दिसून येत आहे. आज सकाळच्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,00,713 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 98,210 रुपये इतका आहे.

चांदीत आले तुफान

गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, चांदीत गेल्या चार दिवसात तुफान आले आहे. या काळात किलोमागे चांदी जवळपास 2100 रुपयांनी महागली आहे. 1 सप्टेंबर रोजी चांदी एक हजाराने तर 2 सप्टेंबर रोजी 100 रुपयांनी महागली होती. तर 3 सप्टेंबर रोजी चांदी 900 रुपयांनी उसळली. आज सकाळच्या सत्रात चांदी 100 रुपयांनी महागल्याचे दिसून येते.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 1,06,021 रुपये, 23 कॅरेट 1,05,596, 22 कॅरेट सोने 97,115 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 79,516 रुपये, 14 कॅरेट सोने 62,022 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,23,220 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.