One Nation One Gold Rate | देशभरात एकाच दरात सोने, बुलियन एक्स्चेंजमुळे परिवर्तनाची नांदी

| Updated on: Aug 02, 2022 | 1:30 PM

One Nation One Gold Rate | दोन दिवसांपूर्वी गुजरामधील गांधीनगरमध्ये बुलियन एक्स्चेंज सुरु झाले. त्यामुळे संपूर्ण देशात सोन्याचा एकच दर निश्चित होईल. 'वन नेशन, वन गोल्ड रेट' योजना लवकरच लागू होईल.

One Nation One Gold Rate | देशभरात एकाच दरात सोने, बुलियन एक्स्चेंजमुळे परिवर्तनाची नांदी
एक देश एक सोन्याचा दर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

One Nation One Gold Rate | एवढ्या मोठ्या विविधतेने नटलेल्या देशात सांस्कृतिक एकोपा असला, काही सण उत्सव सारखे असले तरी सोन्याचे भाव (Gold Rate) मात्र एक नाही. सोन्याचा दर शहराप्रमाणे आणि राज्याप्रमाणे बदलतो. जळगावमधील सोन्याचा भाव आणि अहमदाबादमधील सोन्याचा दर यात फरक (Different Gold Price) पडतो. त्याचा मागे वाहतुकीचा खर्च हे मोठे कारण आहे. वाहतुकीचा खर्च जोडल्यानंतर प्रत्येक राज्यातील सोन्याचा दर बदलतो. देशातंर्गत सोन्याच्या भावात कमालीचा फरक पडतो. दिल्ली आणि चेन्नई तर मुंबई आणि कोलकत्ता येथील सोन्याचा दरात बरीच तफावत दिसून येते. परंतू, आता हा फरक लवकरच दूर होणार आहे. दोन दिवसांपूर्वी गुजरामधील गांधीनगरमध्ये बुलियन एक्स्चेंज (Bullion Exchange) सुरु झाले. त्यामुळे संपूर्ण देशात सोन्याचा एकच दर निश्चित होईल. ‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ योजना (One Nation One Gold Rate Scheme) लवकरच लागू होईल. परिणामी देशभरात कुठे ही सोने घेतले तर त्याच्या दरात फार मोठा परिणाम दिसून येणार नाही.

IIBX म्हणजेच इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून सोन्याची देवाण घेवाण करता येईल. याद्वारे सोन्या-चांदीची आयात करता येईल. या ठिकाणी 125 टन सोन्याची तसेच 1000 टन चांदीची क्षमता आहे. सराफा व्यापारासाठी हा पारदर्शक प्लॅटफॉर्म असेल. IIBX मध्ये 3 वॉल्ट असतील.

हे सुद्धा वाचा

व्यापाराचे नियम काय ?

आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंजच्या मदतीने केवळ पात्र ज्वेलर्सच आयात करू शकतील. पात्र ज्वेलर्स बनण्यासाठी IFSC मध्ये नोंदणी आवश्यक आहे. आयात करण्यासाठी किमान 25 कोटींची निव्वळ संपत्ती असणे आवश्यक आहे. याशिवाय, मागील 3 वर्षांच्या उलाढालीपैकी 90% भाग हा सराफा व्यवसायाचा असावा.

ट्रेडिंगच्या वेळा?

सुरुवातीला सकाळी 9 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत व्यापाराला परवानगी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसात 22 तासांपर्यंत ट्रेडिंग देखील शक्य आहे. पात्र ज्वेलर्सना 11 दिवसांची आगाऊ पेमेंट सुविधा मिळेल. सर्व करार डॉलर्समध्ये आणि सेटलमेंट डॉलरमध्ये सूचीबद्ध केले जातील.

ग्राहकांना काय होईल फायदा

सोने आयातीसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल. यामुळे भारत जागतिक सराफा बाजाराशी जोडला जाईल. येणाऱ्या काळात सोन्याचा भाव काय असावा हेही भारत ठरवेल. यामुळे देशात सराफा आयातीचा नवा मार्ग खुला होणार आहे. IIBX द्वारे आयात स्वस्त होऊ शकते. गुणवत्तेसह किंमत आणि पारदर्शकतेची हमी ही सराफा व्यापाऱ्यांना मिळणार आहे. भविष्यात सोन्याचा दर वाढला तरी स्वस्त दराचा फायदा ग्राहकांना मिळू शकेल. बुलियन एक्सचेंजमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या एका प्लॅटफॉर्मवर येतील. त्याचा लाभ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांना फायदा होईल.

कोणता खर्च वाचणार?

बुलियन एक्सचेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करु शकतील. यात वाहतुकीचा खर्च वाचेल. सोन्याचा दर कमी ठेवण्यातही मदत मिळेल. याबाबत ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले की, वाहतूक खर्चास फाटा मिळाल्यामुळे सोने स्वस्तात होईल.