International Bullions Exchange | देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सराफा बाजाराची सुरुवात, आता भारतही ठरवणार सोन्याच्या किंमती

Indian International Bullions Exchange | देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सराफा बाजाराची सुरुवात गांधीनगर येथे झाली. आता भारताचा ही सोन्याची किंमत ठरवणाऱ्या देशांच्या यादीत समावेश झाला आहे.

International Bullions Exchange | देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सराफा बाजाराची सुरुवात, आता भारतही ठरवणार सोन्याच्या किंमती
भारतही ठरवणार सोन्याच्या किंमती Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 6:42 PM

Indian International Bullions Exchange | देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सराफा बाजाराची सुरुवात गांधीनगर (Gandhinagar)येथे झाली. आता भारताचा ही सोन्याची किंमत ठरवणाऱ्या देशांच्या यादीत समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते या देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचे (Indian International Bullions Exchange) उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी NSE-SGX कनेक्टचे उद्घाटनही केले.हे बुलियन एक्सचेंज गांधीनगरच्या इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरमध्ये (IFSC)आहे. आतापर्यंत, सुमारे 64 ज्वेलर्स IIBX (इंडियन इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज) मध्ये सहभागी झाले आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीजचे (IIFL Security) कमोडिटी तज्ञ अनुज गुप्ता यांनी सुवर्ण बाजारातील या सुवर्ण संधीवर प्रकाश टाकला आहे. या सराफा बाजाराच्या माध्यमातून भारताला काय फायदा होऊ शकतो, याचे विश्लेषण त्यांनी केले आहे.

सोन्याची देवाण घेवाण

IIBX म्हणजेच इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून सोन्याची देवाण घेवाण करता येईल. याद्वारे सोन्या-चांदीची आयात करता येईल. या ठिकाणी 125 टन सोन्याची तसेच 1000 टन चांदीची क्षमता आहे. सराफा व्यापारासाठी हा पारदर्शक प्लॅटफॉर्म असेल. IIBX मध्ये 3 वॉल्ट असतील.

हे सुद्धा वाचा

व्यापाराचे नियम काय ?

आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंजच्या मदतीने केवळ पात्र ज्वेलर्सच आयात करू शकतील. पात्र ज्वेलर्स बनण्यासाठी IFSC मध्ये नोंदणी आवश्यक आहे. आयात करण्यासाठी किमान 25 कोटींची निव्वळ संपत्ती असणे आवश्यक आहे. याशिवाय, मागील 3 वर्षांच्या उलाढालीपैकी 90% भाग हा सराफा व्यवसायाचा असावा.

ट्रेडिंगच्या वेळा?

सुरुवातीला सकाळी 9 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत व्यापाराला परवानगी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसात 22 तासांपर्यंत ट्रेडिंग देखील शक्य आहे. पात्र ज्वेलर्सना 11 दिवसांची आगाऊ पेमेंट सुविधा मिळेल. सर्व करार डॉलर्समध्ये आणि सेटलमेंट डॉलरमध्ये सूचीबद्ध केले जातील.

IIBX चे फायदे काय ?

सोने आयातीसाठी हे एक मोठे प्रवेशद्वार असेल. यामुळे भारत जागतिक सराफा बाजाराशी जोडला जाईल. येणाऱ्या काळात सोन्याचा भाव काय असावा हेही भारत ठरवेल. यामुळे देशात सराफा आयातीचा नवा मार्ग खुला होणार आहे. IIBX द्वारे आयात स्वस्त होऊ शकते. गुणवत्तेसह किंमत आणि पारदर्शकतेची हमी ही सराफा व्यापाऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय जागतिक दागिन्यांच्या बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत होणार आहे.

भावाचे गणित समजून घ्या

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1750 प्रति औंस डॉलर आहे असे गृहीत धरुयात. यामध्ये सरकारचे आयात शुल्क 12.75% जोडवे लागेल. आयात शुल्काव्यतिरिक्त 2.5% कृषी इन्फ्रा उपकर देखील द्यावा लागणार आहे. अतिरिक्त 2 डॉलर आयात शुल्क ही द्यावे लागणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळेही सोन्याच्या किंमती कमी जास्त होतील.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.