AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today News | मंदीच्या भीतीने सोने चकाकले, किमती 3 आठवड्यांच्या उच्चांकावर, काय आहेत आजचे दर?

Gold rate today: मंदीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी सोन्याच्या मागणीत वाढ नोंदवली, त्यामुळे भाव वाढले आहेत. मंदीच्या काळात सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

Gold Silver Price Today News | मंदीच्या भीतीने सोने चकाकले, किमती 3 आठवड्यांच्या उच्चांकावर, काय आहेत आजचे दर?
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 30, 2022 | 12:18 PM
Share

Gold Silver Price Today News | गुरुवारी अमेरिकेने जीडीपी (American GDP) वाढीचे आकडे जाहीर करताच परदेशी बाजारात (Foreign Market) सोन्याच्या किमतींनी (Gold Price Today) उचल खाल्ली. शुक्रवारी, वायदे बाजारात ऑगस्टच्या सोन्याच्या किंमती 1765 डॉलरच्या उच्चांकावर पोहचल्या. या किंमती 3 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचल्या आहेत. तर डिसेंबरच्या किंमती 1785 डॉलरच्या जवळ आहे. मंदीच्या भीतीने सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढला. मागणी वाढल्याचा परिणाम ही त्वरीत दिसून आला. सोन्याच्या किंमतीत ही वाढ झाली. आज 22 कॅरेट सोन्याची किंमती 47,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या संकेतस्थळानुसार, चांदीचा आजचा भाव 58,000 रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे. चांदीची घसरण थांबली असून गेल्या दोन दिवसात चांदीचे भाव (Silver Price Today) वधरल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरवाड्यात सोन्याच्या दरात घसरण आणि तेजी दिसून आली होती.

देशांतर्गत बाजारातही भाव वाढले

परदेशी बाजारातील वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही(Indian Market) दिसून येत आहे. कमोडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याची किंमत 51700 रुपयांच्या जवळ आहे, गेल्या आठवड्यात MCX वर किंमत 49703 रुपये प्रति 10 ग्रॅम या नीचांकी पातळीवर पोहोचली होती आणि तिथून किंमत सुमारे 2000 रुपयांनी वाढली आहे. जगभरात आर्थिक आव्हाने वाढली की सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढते. त्यामुळेच मंदीच्या भीतीने सोन्याच्या दरात मोठी झेप घेतली आहे.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,200 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,490 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 580 रुपये आहे.काल हा दर 565 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच