AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीचे दर घटले की त्यात झाली वाढ ? काय आहेत आजचे दर?

Gold rate today: सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी महिन्यातील ही सलग चौथी घट (consecutive monthly drop) नोंदवण्यात आली आहे. तर चांदीच्या किंमत थोडी वाढली आहे.

Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीचे दर घटले की त्यात झाली वाढ ? काय आहेत आजचे दर?
आजचे सोने चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 29, 2022 | 1:13 PM
Share

Gold Silver Price Today News | अमेरिकन मध्यवर्ती बँक युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने (US Federal Reserve Bank) व्याजदर (Interest Rate) वाढीचा पुन्हा बॉम्ब फोडल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) त्याचे पडसाद बघायला मिळत आहेत. जागतिक सुवर्ण परिषदेने (World Gold Council) पण भारतीय यंदा सोन्याची कमी खरेदी करतील असे भाकीत नोंदवले आहे. भारत यंदा 800 टन सोने आयात करण्याचा अंदाज परिषदेने नोंदवला आहे. सुरुवातीच्या सहामाहीत महागाई असतानाही भारतीयांनी जोरदार सोने खरेदी करुन या अंदाजाला दे धक्का दिला आहे. पण महागाईचा स्पीड पाहता हा अंदाज ही खरा होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या अखेरीस आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसत असली तरी सलग चौथ्या वेळा सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) घट नोंदवण्यात आली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात (Silver Rate Today) मात्र किंचित घट झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमती 47,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या संकेतस्थळानुसार, चांदीचा आजचा भाव 56,500 रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे. भारतीय बाजारात मात्र सोन्यात ज्याप्रमाणात घसरण व्हायला हवी तेवढी दिसून येत नाही. बाजार भाव कमी जास्त होत आहेत. गेल्या पंधरवाड्यात सोन्याच्या दरात घसरण आणि तेजी दिसून आली होती.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,100 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,380 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 565 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद