Gold Demand Reduce | महागाईने सोन्याचा तोरा उतरणार? मागणीत घट येण्याची शक्यता

Gold Demand Reduce | महागाई वाढली तरी यंदाच्या सहामाहीत सोन्याची मागणी काही कमी झालेली नाही. परंतू, येत्या काही दिवसात ही मागणी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Gold Demand Reduce | महागाईने सोन्याचा तोरा उतरणार? मागणीत घट येण्याची शक्यता
सोन्याची मागणी घटणार?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 11:51 AM

Gold Demand Reduce | भारत हा सुवर्णप्रेमी (Gold lover) देश म्हणून जगविख्यात आहे. भारतीय सध्या सातत्याने महागाईचा (Inflation) सामना करत आहेत. सर्वच क्षेत्रात महागाई वाढत असताना जीवनावश्यक वस्तुंवर सरकारने जीएसटी (GST) वाढवल्यानं महागाईच्या आगीत तेल ओतल्या गेले आहे. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत 2022 च्या पहिल्या सहामाहीत (Sixth Month) 42 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. परंतु, पुढील सहामाहीत या वाढीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. महागाईमुळे सोन्यातील गुंतवणुकीवर (Gold Investment) परिणाम होईल. महागाईमुळे नागरिकांच्या अतिरिक्त उत्पन्नावर मर्यादा (Limitation on additional income) येणार आहे. त्यामुळे जगण्यासाठीच कसरत करणारे भारतीय सोन्यात गुंतवणूक करण्याची फक्त स्वप्न पाहु शकतील. परिणामी सोनं खरेदीत घट येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) इंडियन ऑपरेशन चे प्रादेशिक सीईओ पी. आर. सोमसुंदरम यांनी सोन्यातील मागणी घटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोने खरेदी घटल्यास त्याचा किंमतीवर थेट परिणाम होईल. सध्या एका वर्षांहून अधिक कालावधीसाठी या किंमती कमी झाल्याचा त्यांनी दावा केला आहे. मागणी कमी झाल्यास देशाची सध्याची व्यापार तूट कमी होण्यास मदत होणार आहे. इतकेच नव्हे तर घसरत्या रुपयालाही त्याचा आधार मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

धोके आणि संधी

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे सीनिअर अॅनालिस्ट ईएमईए लुईस स्ट्रीट यांनी सोने खरेदीतील धोके आणि संधीचे गणित मांडले आहे. त्यानुसार, अनेक देशांमध्ये आर्थिक परिस्थिती खालवली आहे. डॉलरची सातत्याने होणारी वाढ ही धोकेदायक ठरु पाहत आहे. या सर्वाचा परिणाम ग्राहकांकडून होणाऱ्या मागणीवर पडणार आहे.

800 टनांची मागणी

वर्ल्ड गोल्ड कौन्सिल-इंडियाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षासाठी सोन्याची 800 टनांपेक्षा अधिक मागणी असेल. केंद्र सरकारने सोन्यावर केलेल्या 5 टक्के शुल्कवाढीचा सोन्याच्या मागणीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी पी.आर सोमसुंदरम यांनी सांगितले. 2021 मध्ये भारतात सोन्याची मागणी सुमारे 797 टन होती.

काय आहे अहवालात ?

  1. या तिमाहीत सोन्याच्या किमतीत 6 टक्के घट झाल्याने सोने ईटीएफवरही त्याचा परिणाम दिसून आला.
  2. दुसऱ्या तिमाहीत सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांच्या मागणीत स्थिरता आहे. या वर्षात ही मागणी 245 टन इतकी होती.
  3. कोरोनामुळे आणि सततच्या टाळेबंदीमुळे चीनमधील मागणीत कमालीची घट झाली आहे.दागिन्यांच्या विभागात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी 4 टक्क्यांनी वधारून 453 टनांवर पोहोचली.
  4. महागाईमुळे ग्रामीण भागातील जनतेला पैशांची बचत करुन ती खरेदीसाठी वापरणे कठीण झाले आहे.
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.