Gold Price Today News | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण, काय आहेत आजचे दर?

Gold rate today: सोने आणि चांदीचे दर आज किंचित कमी झाले. शुक्रवारपासून सोन्या-चांदीचे दर वाढलेले होते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी या किंमतीत मामूली घसरण झाली.

Gold Price Today News | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण, काय आहेत आजचे दर?
सोने चांदीचे दर किंचित घटलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 1:07 PM

Gold Silver Price Today News | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतींवर (Gold Silver rate today) स्पष्ट दबाव दिसून आला. सकाळी 11.50 वाजता वायदे बाजारात MCX वर ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 86 रुपयांनी घसरले आणि 50558 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर व्यापार करायला लागले. ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा दर (Gold rate today) 85 रुपयांनी घसरुन 50794 रुपयांच्या स्तरावर पोहचले. तर डिसेंबर डिलव्हरीच्या सोन्याचा भाव 85 रुपयांच्या घसरणीसह 50987 रुपयांवर व्यापार करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यावर सोमवारी 25 जुलै 2022 रोजी दबाव दिसून आला. सध्या हा भाव 5 डॉलरच्या घसरणीसह 1722 डॉलर प्रति औसवर व्यापार करत आहे. सोन्यासोबतच चांदीवर ही जास्त दबाव दिसून येत आहे. भारतीय बाजारात, वायदे बाजारात, MCX वर सप्टेंबर डिलिव्हरीच्या चांदीचे दर (Silver rate today) 298 रुपयांनी घसरले आणि 54833 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर व्यापार करायला लागले. डिसेंबर डिलिव्हरीच्या चांदीत 270 रुपयांची घसरण होत ते 55992 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यापार करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात ते 0.77 टक्क्यांची घसरण झाली.

महागाई असतानाही सोन्यामध्ये घसरण

महागाईचे आकडे सातत्याने वाढत आहेत. अमेरिका आणि युरोपीय देशात महागाईने गेल्या चार दशकातील रेकॉर्ड तोडला आहे. महागाई आणि सोने हे मित्र मानल्या जातात. असे म्हणतात की ज्यावेळी महागाई वाढते, त्याचवेळी सोन्याचे भाव ही गगनाला भिडतात. असे असले तरी, वाढत्या महागाईच्या काळात सोन्याच्या भावात मात्र सातत्याने घसरण होत आहे. 2022 मध्ये स्पॉट गोल्डमध्ये 5.5 टक्के घट दिसून आली. तर अमेरिकेतील शेअर बाजार S&P 500 मध्ये 17 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.

हे सुद्धा वाचा

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,900 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,600 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 551 रुपये आहे.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.