Gold Silver Price : सोन्याची उसळी, भाव पुन्हा वधारले, तेजीचे सत्र कायम राहील का?

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या किंमतींनी पुन्हा एकदा उसळी मारली आहे..

Gold Silver Price : सोन्याची उसळी, भाव पुन्हा वधारले, तेजीचे सत्र कायम राहील का?
सोने-चांदीचे दर काय
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 22, 2022 | 5:33 PM

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या किंमतींनी (Gold Silver Price Today) पुन्हा एकदा उसळी मारली. त्यामुळे गुंतवणूकदार (Investors) आणि खरेदीदार यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोन्याची घौडदौड दणक्यात सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात सोने कोणता विक्रम (Record) नावावर कोरते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने खरेदीदारांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. ऐन लग्नसराईत दरवाढ झाल्याने वधू-वर पक्षाचा हिरमोड झाला आहे.

https://ibjarates.com/ ने भारतीय सराफा बाजारात गुरुवारी, 22 डिसेंबर 2022 रोजी सोन्या-चांदीचा दर जाहीर केला. त्यानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 54,700 रुपये होता. बुधवारी वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 25 रुपयांनी वाढला. 10 ग्रॅम सोन्याचा दर 54,923 रुपये होता.

वायदे बाजारात चांदीही चमकली. चांदीच्या किंमतीत 85 रुपयांची वाढ झाली. चांदी 69,727 रुपये प्रति किलो झाली. पहिल्या सत्रात चांदीचा भाव 69,592 रुपये झाला. त्यानंतर चांदीने जोरदार उसळी घेतली. चांदीचा भाव 69,630 रुपय प्रति किलोवर बंद झाला.

ibjarates.com नुसार 995 शुद्ध सोन्याचा दर 54,485 रुपये, 916 शुद्ध सोन्याचा दर 50,109 रुपये, 750 शुद्ध सोने 41,028 रुपये तर 585 शुद्ध सोन्याचा भाव 32,002 रुपये होता. 999 शुद्ध चांदीचा दर 68,177 रुपये प्रति किलो होता.

सोन्या चांदीतील भाव वृद्धी बाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेजचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी अंदाज व्यक्त केला. त्यानुसार, गेल्या सत्रापेक्षा सोन्यात उसळी आली असली तरी हे दर आता स्थिर आहेत. बँक ऑफ जपानच्या धोरणानंतर डॉलरमध्ये घसरण आली आहे. त्याचा हा परिणाम आहे.

केंद्रीय बँका महागाई आटोक्यात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सरत्या वर्षात 2022 मध्ये सोन्याच्या भावात 15 टक्के तेजी दिसून आली आहे.