Sovereign Gold Bond : यंदा स्वस्तात सोने खरेदीची ही शेवटची संधी, गुंतवणुकीसाठी उरलेत अवघे दोन दिवस, या योजनेत मिळणार तगडा रिटर्न

Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची यंदाची ही शेवटची संधी आहे..

Sovereign Gold Bond : यंदा स्वस्तात सोने खरेदीची ही शेवटची संधी, गुंतवणुकीसाठी उरलेत अवघे दोन दिवस, या योजनेत मिळणार तगडा रिटर्न
स्वस्तात सोने खरेदी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 6:05 PM

नवी दिल्ली : स्वस्तात सोने खरेदीची यावर्षातील ही शेवटची संधी आहे. सोन्यात गुंतवणुकीसाठी भारत सरकारनेही खास ऑफर आणली आहे. केंद्र सरकारच्या सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond Scheme)आणली आहे. गोल्ड बाँडच्या विक्रीचा हा तिसरा टप्पा आहे. 19 डिसेंबर रोजी ही योजना सुरु झाली आहे. 23 डिसेंबर रोजीपर्यंत गुंतवणूकदारांना या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.

सोन्याचा भाव सध्या 55 हजार रुपयांच्या प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या माध्यमातून तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी आहे. योजनेत एक ग्रॅमपासून सोने खरेदी करता येते. या बाँडमध्ये रोखीत, डिमांड ड्राफ्ट, नेट बँकिंगच्या सहाय्याने खरेदी करता येते.

अर्थ मंत्रालयानुसार, सरकारी गोल्ड बाँडमध्ये 2022-23, तिसऱ्या टप्प्यात 19 ते 23 डिसेंबर दरम्यान गुंतवणूक करता येईल.ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून रक्कम अदा करणाऱ्यांना 50 रुपयांची सवलत मिळेल.या सवलतीमुळे सोने आणखी स्वस्तात मिळेल.

हे सुद्धा वाचा

27 डिसेंबर रोजी पात्र अर्जदारांना बाँड जारी करण्यात येईल. गोल्ड बाँडची इश्यू प्राईस 999 शुद्ध सोन्याच्या आधारे निश्चित होतो. योजनेत 5,409 रुपये प्रति ग्रॅम दर निश्चित आहे. ऑनलाईन खरेदीदारांना 5,359 रुपये प्रति ग्रॅमने सोने खरेदी करता येईल. तर या योजनेचा 6 ते 10 मार्च दरम्यान चौथा टप्पा असेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप्पं आहे.

सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणली आहे. सरकारने 5 नोव्हेंबर 2015 पासून सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजना सुरु केली. गोल्ड बॉण्ड्स सरकारच्यावतीने RBI जारी करते. आतापर्यंत आरबीआयने गोल्ड बॉण्ड्सचे आठ टप्पे आले आहेत. या गोल्ड बॉण्ड्सची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीवर आधारित असते.

सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या सवलत मिळते.  प्रति ग्रॅम 50 रुपयांची सवलत मिळते.

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते.

या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यापूर्वीच 5 व्या वर्षी योजनेतून बाहेर पडता येते. त्यानुसार त्यांना परतावा मिळतो.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.