AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता रोहित शेट्टी टार्गेटवर, लॉरेन्स बिश्नोई गँगचा शुभम लोनकर कोण आहे?

मायानगरी मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्डची दहशत. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, बिश्नोई गँगच्या शुभम लोनकरकडून जबाबदारीचा दावा.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता रोहित शेट्टी टार्गेटवर, लॉरेन्स बिश्नोई गँगचा शुभम लोनकर कोण आहे?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 01, 2026 | 5:15 PM
Share

Shubham Lonkar : मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड आणि गँगस्टरांची दहशत जाणवू लागली आहे. सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या सनसनाटी हत्येचे घाव अद्याप ताजे असतानाच आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील शेट्टी टॉवर निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडवली आहे. या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित कुख्यात गँगस्टर शुभम लोनकर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे.

या पोस्टमध्ये केवळ रोहित शेट्टीच नाही तर संपूर्ण बॉलिवूडला थेट धमकी देण्यात आली आहे. ‘लाइनवर या, नाहीतर परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा देत या पोस्टमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा उल्लेख करत बॉलिवूडला अधिक भयभीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.

आज सकाळी रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली तेव्हा सुरुवातीला हा केवळ धमकावण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात होते. मात्र, शुभम लोनकर यांच्या नावाने व्हायरल झालेल्या पोस्टमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आज रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या फायरिंगची जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही अनेकदा इशारा दिला होता पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हा फक्त छोटासा ट्रेलर आहे. आता ऐकले नाही तर पुढची गोळी थेट बेडरूममध्ये छातीवर लागेल.’

या धमकीच्या पोस्टमध्ये आरजू बिश्नोई, हरि बॉक्सर आणि हरमन संधू यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ‘बॉलिवूडवाल्यांनी वेळेत सुधारणा केली नाही तर बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था केली जाईल’ असा थेट इशाराही देण्यात आला आहे.

कोण आहे शुभम लोनकर?

शुभम लोनकर सध्या मुंबई पोलिसांच्या मोस्ट वाँटेड यादीत आहे. तो मूळचा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या काही वर्षांत तो लॉरेन्स बिश्नोई गँगचा महत्त्वाचा मोहरा म्हणून पुढे आला आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांडातही शुभम लोनकरचे नाव मुख्य कटकारस्थानी म्हणून पुढे आले होते. तपासात असे समोर आले होते की, शुभमनेच शूटरांना शस्त्रपुरवठा केला आणि त्यांचा संपर्क लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी जोडून दिला.

शुभम लोनकर केवळ एक सामान्य गुन्हेगार नसून, तो बिश्नोई गँगचा तांत्रिक आणि सोशल मीडिया हँडलर असल्याचेही सांगितले जाते. अकोल्यात तो पूर्वी डेअरी व्यवसाय चालवत होता. मात्र, हळूहळू लॉरेन्स बिश्नोईच्या विचारसरणीच्या प्रभावाखाली येत तो गुन्हेगारी जगतात इतका खोलवर अडकला की आज तो थेट बॉलिवूडमधील दिग्गजांना उघडपणे धमक्या देऊ लागला आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका