AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : 2 आठवड्यांत सोने 2000 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

मात्र, आज त्याच्या किमतीत किंचित वाढ झालीय. MCX वर आज सोन्याचा वायदा 0.24 टक्क्यांनी वाढून 46,476 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर चांदीचा दरही 0.30 टक्क्यांनी वाढला.

Gold Price Today : 2 आठवड्यांत सोने 2000 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
संग्रहित छायाचित्र
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Aug 13, 2021 | 11:50 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदी (Gold-Silver Price Today) खरेदी करण्याची आता चांगली संधी आहे, कारण गेल्या 2 आठवड्यांच्या घसरणीनंतर सोन्याची किंमत थेट 2000 रुपयांनी खाली आलीय. मात्र, आज त्याच्या किमतीत किंचित वाढ झालीय. MCX वर आज सोन्याचा वायदा 0.24 टक्क्यांनी वाढून 46,476 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर चांदीचा दरही 0.30 टक्क्यांनी वाढला.

सोने आणि चांदीची किंमत काय? (Gold-Silver Price Today)

MCX वर ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 0.24 टक्क्यांनी वाढून 46,476 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याच वेळी चांदीचे दरदेखील 0.30 टक्क्यांनी वाढून 62,044 वर व्यवहार करीत आहेत.

2 आठवड्यांपूर्वी ते 48,390 रुपये प्रति 10 ग्रॅम होते

जर आपण दोन आठवड्यांपूर्वीबद्दल बोललो तर सोन्याचा दर 48,390 रुपये प्रति 10 ग्रॅम होता आणि चांदीचा भाव 67,976 रुपये प्रति किलो होता. चांदीचे भाव 6000 रुपयांपर्यंत कमी झालेत.

तर विक्रमी पातळी 9724 रुपयांनी स्वस्त

MCX वर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीनं सुमारे 56,200 रुपयांची उच्च पातळी गाठली होती. त्यानुसार विक्रमी पातळीवरून सोने 9,724 रुपयांनी स्वस्त झाले.

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा

तुम्ही घरी बसून हे दर सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही लेटेस्ट दर तपासू शकता.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता

आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता.

संबंधित बातम्या 

कधी काळी खिशात 25 पैसे नव्हते, आज 500 कोटींचे मालक, कोण आहेत सांगलीचे अशोक खाडे?

ग्रामपंचायत किंवा सरपंचाच्या स्वाक्षरीमधील दस्तावेजातील पत्ता आधारनुसार बदलता येतो का? जाणून घ्या

Gold Price Today: In 2 weeks, gold is cheaper by Rs. 2000, check the price of 10 grams of gold

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ