AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत किंवा सरपंचाच्या स्वाक्षरीमधील दस्तावेजातील पत्ता आधारनुसार बदलता येतो का? जाणून घ्या

काही काळापूर्वी आधार कार्ड धारकांच्या सोयीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) कोणत्याही पुराव्याशिवाय पत्ता अद्ययावत करण्याची सुविधा दिली. पण आता यूआयडीएआयने ती सुविधा बंद केलीय. त्यामुळे तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे.

ग्रामपंचायत किंवा सरपंचाच्या स्वाक्षरीमधील दस्तावेजातील पत्ता आधारनुसार बदलता येतो का? जाणून घ्या
Aadhar Card Online
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 7:23 AM
Share

नवी दिल्लीः आजच्या तारखेमध्ये आधार आपल्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज बनलाय. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे. कधी कधी आपल्याला नोकरी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शहर बदलावे लागते. अशा परिस्थितीत आपला पत्ता देखील बदलतो, जो आधार कार्डवर अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी काही पुरावे हवे आहेत. काही काळापूर्वी आधार कार्ड धारकांच्या सोयीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) कोणत्याही पुराव्याशिवाय पत्ता अद्ययावत करण्याची सुविधा दिली. पण आता यूआयडीएआयने ती सुविधा बंद केलीय. त्यामुळे तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे.

? मला आधार कार्डवरील माझा पत्ता बदलायचाय

ट्विटरवर एका वापरकर्त्याने UIDAI ला विचारले की, “मला आधार कार्डवरील माझा पत्ता बदलायचा आहे. त्यामुळे आता मी ग्रामपंचायत किंवा सरपंचांच्या स्वाक्षरीने पत्त्याच्या पुराव्यामध्ये आधारनुसार बदल करू शकतो का?, त्याला UIDAI उत्तर दिलेय, UIDAI ने पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची लिस्टच दिलीय.

? यापैकी एकाची आवश्यकता असणार

पासपोर्ट, बँक स्टेटमेंट/पासबुक, पोस्ट ऑफिस खात्याचा तपशील/ पासबुक, रेशन कार्ड, व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी फोटो ओळखपत्र/PSU द्वारे जारी केलेले सेवा फोटो ओळखपत्र, वीज बिल (3 महिन्यांपेक्षा जुने नाही), पाणी बिल (3 महिन्यांपेक्षा जुने नाही), टेलिफोन लँडलाईन बिल (3 महिन्यांपेक्षा जास्त जुने नाही), मालमत्ता कर पावती (1 वर्षापेक्षा जुनी नाही), क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (3 महिन्यांपेक्षा जुने नाही), विमा पॉलिसी, लेटरहेडवर बँकेकडून छायाचित्र पत्र.

? आधार कार्डचा पत्ता ऑनलाईन बदलण्यासाठी ‘या’ टप्प्यांचे पालन करा

?थेट UIDAI लिंकवर लॉगिन करा – ssup.uidai.gov.in/ssup/ ?’प्रोसीड टू अपडेट’ वर क्लिक करा. ?12 अंकी UIDAI क्रमांक टाका. ?सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड भरा. ?’ओटीपी पाठवा’ पर्यायावर क्लिक करा. ?तुमच्या आधार-नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. ?ओटीपी प्राप्त केल्यानंतर ओटीपी भरा. ‘?लॉगिन’ वर क्लिक करा.

तुमचे आधार तपशील प्रदर्शित केले जातील. पत्ता बदला आणि आपल्या आयडी आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी 32 पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि सबमिट करा.

संबंधित बातम्या

Videocon Industries प्रकरणात सेबीने 11 कंपन्यांना ठोठावला दंड

कोरोनाच्या संकटात नोकरी गमावली, तर हा व्यवसाय सुरू करा आणि दरमहा 10 लाख कमवा

Can the address be changed according to the basis of the document signed by the Gram Panchayat or Sarpanch? Find out

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.