जळगावात सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांनी घसरण, जाणून घ्या किती आहे किंमत

जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर प्रति तोळ्याला जीएसटीशिवाय 47 हजार रुपये तर 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 400 रुपये प्रतितोळा असे नोंदवण्यात आले. (Gold prices fall by Rs 1,500 in Jalgaon, know what the price is)

जळगावात सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांनी घसरण, जाणून घ्या किती आहे किंमत
जळगावात सोन्याच्या दरात घसरण
| Updated on: Jun 25, 2021 | 6:20 PM

जळगाव : कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याचे दर आता 47 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली होती. त्यानंतर सातत्याने सोन्याचे दर 100 ते 200 रुपयांनी कमी अधिक राहिले आहेत. जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर प्रति तोळ्याला जीएसटीशिवाय 47 हजार रुपये तर 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 400 रुपये प्रतितोळा असे नोंदवण्यात आले. (Gold prices fall by Rs 1,500 in Jalgaon, know what the price is)

गुंतवणूकदारांकडून सोन्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले आहेत. दुसरीकडे, सुरक्षित परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदारांकडून सोन्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य दिले जात आहे. त्या मुळे, सोन्याची मागणी घटली आहे. स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. या प्रमुख कारणांमुळे सोन्याचे दर घसरत आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर देखील होत असल्याने जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सोन्याचे दर तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक कमी झाले आहेत.

गुरुवारी सोन्याच्या दरात घट, चांदीला तेजी

IBJA च्या वेबसाईटवरच्या माहितीनुसार, 24 जूनला 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 47 हजार 216 रुपये प्रती दहा ग्राम एवढा होता. चांदीचा भाव 68 हजार 123 रुपये प्रती किलो एवढा होता. दिल्लीच्या बाजारात 24 जूनला सोन्याच्या दरात घट तर चांदीच्या भावात तेजी पहायला मिळाली. गुरुवारी सोनं 93 रुपयाच्या घटीसह प्रती 10 ग्राम 46 हजार 283 एवढं होतं. चांदीची किंमत 99 रुपयाच्या तेजीसह 66 हजार 789 रुपये प्रती किलोवर पोहोचली होती. (Gold prices fall by Rs 1,500 in Jalgaon, know what the price is)

इतर बातम्या

ठाण्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण, पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पॉलिसीबाजार डॉट कॉमची इन्शुरन्स ब्रोकरेज सेगमेंटमध्ये एन्ट्री, 15 रिटेल स्टोरसह सुरुवात